पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले छगन भुजबळ ?
केंद्र सरकारने पीएनजीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जेथे पीएनजीचे कनेक्शन मिळत असेल तेथे सर्वांनी ते घ्यावे, कारण तीन महिन्यांनी एलपीजी कनेक्शन बंद करण्यात येणार असल्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
जर तुमच्या येथे पाईप्ड नॅचरल गॅस म्हणजे पीएनजी कनेक्शन मिळत असेल तर कनेक्शन घ्यावे, कारण तेथे कदाचित तीन महिन्यांनंतर एलपीजी बंद करण्यात येईल असे केंद्राचे धोरण असल्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार पीएनजीचा भर वाढवत आहे. पीएनजीचा प्रसार करण्यात येत आहे. जर पीएनजी मिळत असेल तर वेळीच अर्ज करावा, आणि कनेक्शन घ्यावे कारण पुढे तेथे तीन महिन्यांनी एलपीजी बंद करण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारची या संदर्भात बैठक झाली होती. या बैठकीला केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर साहेब, पेट्रोलियम मंत्री हरिदीप पुरी सिंग, अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी, आणि राज्यातील वेगवेगळे मंत्री आणि सेक्रेटरी उपस्थित होते. पीएनजीचा वापर वाढला पाहिजे. मागे त्यांचे पत्र होते की तीन महिन्यानंतर एलपीजी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी अर्ज करुन पीएनजीच्या जोडण्या मंजूर करुन घेतल्या पाहिजेत असेही भुजबळ यांनी सांगितले.
Published on: Mar 28, 2026 04:46 PM
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम

