AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लाईट बंद म्हणजे…’ महिलांच्या शोषणासाठी खरात वापरायचा कोडवर्ड, हादरवणारी माहिती समोर

Ashok Kharat Code Words : अशोक खरातबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आतापर्यंत खरातवर 8 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. आता तो कोडवर्ड वापरत असल्याचेही समोर आले आहे.

'लाईट बंद म्हणजे...' महिलांच्या शोषणासाठी खरात वापरायचा कोडवर्ड, हादरवणारी माहिती समोर
Kharat Code WordImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 27, 2026 | 9:53 PM
Share

भोंदूबाबा आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरातबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आतापर्यंत खरातवर 8 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. खरातविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (SIT) त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून वेगवेगळे खुलासे होत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार खरात आपल्या कार्यालयात वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी एक खास कोडवर्ड वापरत होता, ज्याबाबत त्याच्या कर्मचाऱ्यांना माहिती होती. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

खरात वापरायचा खास कोडवर्ड

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, कॅप्टन खरात जेव्हा केबिनमध्ये एखाद्या महिलेला शुद्धीकरणासाठी बोलवत असे, तेव्हा तो केबिनमधील झुंबराची लाईट बंद करत असे. याचा अर्थ असा होता की कोणालाही केबिनमध्ये एंट्री नाही. याच काळात तो महिलांचे लैंगिक शोषण करत असायचा. तपासातील माहितीनुसार, महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी ‘शुद्धीकरण’ हा शब्द कोड म्हणून वापरला जात होता. व्यवसायात यश आणि अडथळे दूर करण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यासाठी अवतार पूजा हा कोड शब्द वापरला जात होता.

जादुई तुर्की मध

अशोक खरातच्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी खरात भक्तांना जादुई तुर्की मध देत होता. हा मध तुर्कीतील गुहेतून आणलेला दुर्मिळ जादुई मध असल्याचे सांगून लोकांना तो 9 लाख रुपये प्रति किलो दराने विकत होता. सध्या सुरु असलेल्या तपासादरम्यान, तपास पथकाला 50 हून अधिक लोकांनी फोन करून खरातच्या काळ्या कारनाम्यांची माहिती दिली आहे. त्यामुळे खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे.

आमदाराची बायको खरातच्या संपर्कात असल्याची माहिती

भोंदू अशोक खरात याचे कारनामे, संपत्तीचा तपशील याबाबत कसून माहिती गोळा केली जात आहे. याचदरम्यान नवी अपडेट समोर येताना दिसत आहे. अशोक खरातच्या ‘विशेष भक्त परिवारात’ एका आमदाराच्या पत्नीचा समावेश असल्याची चर्चा आहे. अनेक राजकीय नेते, मंत्री, राजकारणी हे भोंदू बाबाच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी जात होते. याचाच एक भाग म्हणून एका आमदाराची पत्नी आहे, तिचं नाव समोर येत आहे. ती सातत्याने या भोंदूबाबाच्या संपर्कात होती. नाशिकमधील त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या कार्यालयात ती जात होती अशी माहिती समोर आली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?