AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या माशांना वाचवण्याकरिता खरातचा बळी घेणार… राज्यातील बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, थेट..

अशोक खरात प्रकरणात राज्य हादरले आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. यादरम्यानच आता विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले. यावेळी त्यांनी मोठी शंका देखील उपस्थित केली.

मोठ्या माशांना वाचवण्याकरिता खरातचा बळी घेणार... राज्यातील बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, थेट..
Ashok Kharat
| Updated on: Mar 29, 2026 | 11:01 AM
Share

विजय वडेट्टीवार यांनी नुकताच केलेल्या दाव्याने मोठी खळबळ उडाली. खरात प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टोला लगावत थेटपणे म्हटले की, खरातला एपस्टिन सारखे मारले जाऊ शकते. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या दाव्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, खरात वरून खळबळ माजली आहे. केरकर म्हणाले, 39 आमदार आहेत, माझं नाव कशाला घेता? ह्या 39 लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कायदे बनवणाऱ्यांनी कायदे मोडले असले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. हेच नाही तर दीपक केसरकर यांना चॅलेंज देत विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, केसरकरांनी 39 लोकांची नावे जाहीर करायला हवीत.

विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, खरातची वरात कुठपर्यंत जाते हे महत्त्वाचे आहे. ते पूर्ण व्हिडिओ उघड केले तर सरकारला हादरे बसणार. मोठ्या मासांना वाचवण्यासाठी खरातचा बळी घेतला जाईल. पुरावे नष्ट करण्यासाठी खरातचे एपस्टीन करतील. उद्या खरात बरं वाईट होईल अनेक पुरावे नष्ट करतील कायद्याने खरात शिक्षा दिली पाहिजे. भोंदूगिरी मध्ये सहकार्य असणाऱ्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. एक्स्टींग जसा झाला तसं या एफेस्टिंगचं होऊ नये सरकारने काळजी घेतली पाहिजे.

मोदींनी देश वाऱ्यावर सोडला आहे. निवडणुका सोडून ह्याच्यावर दुसर काही नाही. लोकांना नाईमध्ये उभे केले आहे. कालचा बळी आम्ही घेतला काय? बोलताना तारतम्य ठेवल पाहिजे. ज्योती वाघमारे ह्या बोलल्या नाही तर त्यांची दखल कोण घेईल. अंधारात आपलं पाप झाकावे, ह्यासाठी हे सर्व लोक आमदार, मंत्री सर्वांची चौकशी झाली पाहिजे. रोजचा अहवाल लोकांसमोर ठेवला पाहिजे. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, भाजपा हा अजगर आहे. तो सर्वांना हळू हळू गिळंकृत करणार.

हे एनाकोंडाचा बाप आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या विधानानंतर मोठी खळबळ उडाली. खरात प्रकरणात दररोज मोठे खुलासे होताना दिसत आहेत. अनेक महिला या अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. धक्कादायक व्हिडीओही सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर पुढे बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, लहान मुलीच्या शोषणामध्ये एन्काऊंटर केला गेला होता. त्याला वाचवण्याच्या प्रयत्न झाला मोठ्या माशांना वाचवण्यासाठी.

अमावस्या बडे नेते खरातच्या घरी जात असतील खरातच्या पापात सगळे पाप अंधारात करण्यासाठी जात होते. अंधारात आपले पाप झाकण्यासाठी जात होते जे खरातला भेटला त्यांची चौकशी झाली पाहिजे. एसआयटीमध्ये काही निष्क्रिय निघत नाही. न्यायाधीश यांच्या पुढाकाराने चौकशी झाली पाहिजे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय