AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SLA vs INDW : साई सुदर्शनचा तडाखा, 8 दिवसात दुसऱ्यांदा शतकी धमाका

INDA vs SLA : साई सुदर्शन याने श्रीलंका दौऱ्यात 8 दिवसांत दुसरं शतक ठोकून क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. साईने या 2 शतकांसह श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दावा आणखी मजबूत केला आहे.

SLA vs INDW : साई सुदर्शनचा तडाखा, 8 दिवसात दुसऱ्यांदा शतकी धमाका
Sai Sudharsan Team IndiaImage Credit source: Bcci x Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 03, 2026 | 11:55 PM
Share

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात टी 20I मालिका खेळत आहे. उभयसंघातील दुसरा टी 20I सामना हा 4 जुलैला खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंडिया ए टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए यांच्यात 2 मॅचची अनऑफीशियल टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील पहिला सामना अनिर्णित राहिला. तर दुसरा सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आज (3 जुलै) आटोपला. श्रीलंकेने पहिल्या डावात सर्वबाद 366 धावा केल्या. भारताने प्रत्युत्तरात 63 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 247 धावा केल्या. भारताला इथवर पोहचवण्यात ओपनर साई सुदर्शन याने प्रमुख भूमिका बजावली. साईने नाबाद शतक झळकावलं. साईचं 8 दिवसातील हे दुसरं शतक ठरलं.

साईचं नाबाद शतक

साईने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 104 धावा केल्या आहेत. साईने या खेळीसह त्याच्यावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं आहे. साईने या खेळीदरम्यान 184 चेंडूंचा सामना केला. तसेच एकूण 13 चौकार लगावले आहेत. साईच्या या खेळीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहचली आहे. साईने पहिल्या सामन्यातही शतक लगावलं होतं. साईने त्या सामन्यात 132 धावांची खेळी केली होती.

साई टीम इंडियासाठी तिसऱ्या स्थानी खेळतोय. साई गेल्या काही मालिकांपासून टीम इंडियात आहे. मात्र साईचं स्थान अजूनही निश्चित नाही. त्यामुळे साई संघातील स्थान पक्क करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाला या दौऱ्यात 2 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे साईला या दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसऱ्या सामन्यात आतापर्यंत काय झालंय?

भारताने टॉस जिंकला. कर्णधार ध्रुव जुरेल याने श्रीलंकेला फलंदाजीसाठी भाग पाडलं. श्रीलंकेने 110 ओव्हरमध्ये 366 रन्स केल्या. श्रीलंकेसाठी कर्णधार सहान अरचिगे याने सर्वाधिक धावा केल्या. सहानने 127 धावा केल्या. तर इतरांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर एकालाही अर्धशतकापर्यंत पोहचता आलं नाही. भारतासाठी गुरनूर ब्रार आणि सारांश जैन या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स मिळवल्या. तर यश ठाकुर याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

भारताचा पहिला डाव

भारतासाठी अमन मोखाने आणि साई सुदर्शन या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 66 धावा जोडल्या. त्यानंतर अमन मोखाडे 38 धावांवर बाद झाला. तर खेळसंपेपर्यंत साईने देवदत्त पडीक्कल याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 301 बॉलमध्ये 181 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली आहे. देवदत्त पडीक्कल याने 151 चेंडूत नाबाद 94 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता साई आणि देवदत्त दोघे तिसऱ्या दिवशी आणखी किती धावा जोडतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात