AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! ऐश्वर्या रायसोबत नाव जोडल्या गेलेल्या अभिनेत्याच्या घराबाहेर धाड धाड करत बुलडोझर कारवाई, मोठं नुकसान; पहिली प्रतिक्रिया समोर…

गुरुग्राममध्ये प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला आहे, ज्याचा फटका प्रसिद्ध अभिनेते चंद्रचूड सिंग यांच्या घराबाहेरील बांधकामाला बसला. डीएलएफ फेज 3 मधील या कारवाईमुळे मोठं नुकसान झालं असून, नियमांचं उल्लंघन करून केलेलं बांधकाम तोडण्यात आलं.

मोठी बातमी ! ऐश्वर्या रायसोबत नाव जोडल्या गेलेल्या अभिनेत्याच्या घराबाहेर धाड धाड करत बुलडोझर कारवाई, मोठं नुकसान; पहिली प्रतिक्रिया समोर...
Chandrachur SinghImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 04, 2026 | 8:20 AM
Share

हरियाणाच्या गुरुग्राममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुरुग्राममध्ये प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला आहे. गुरुग्राममधील सर्वात पॉश इलाका असलेल्या डीएलएफ फेज 3 शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामावर कारवाई करण्यात आली. याचा फटका प्रसिद्ध अभिनेचा चंद्रचूड सिंग याच्या घरालाही बसला आहे. त्याच्या घराच्या आसपासचं अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता चंद्रचूड सिंग यांच्या घराच्याबाहेर नियम धाब्यावर ठेवून अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. हे काम डीटीपीच्या पथकाने तोडलं आहे. या कारवाईचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

त्या तिथेच…

चंद्रचूडच्या घराच्या बाहेर पार्किंग एरिया आहे. या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलं होतं. टाऊन अँड कंट्री प्लानिंग डिपार्टमेंटच्या तपासात हे सर्व बांधकाम अवैध आणि नियमांचं उल्लंघन करणारं असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आज शुक्रवारी टास्क फोर्सची टीम तयारीनेच घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी अनधिकृत बांधकाम तोडून टाकलं.

नोटीस बजावली, पण…

ही कारवाई अचानक किंवा कोणतीही सूचना न देता करण्यात आलेली नाही. गुरुग्राम प्रशासनाने अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस बजावली होती. पण त्याकडे अभिनेत्याने कानाडोळा केला. तसेच या नोटिशीला कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे प्रशासनाने आज ही तोडक कारवाई केली आहे.

व्हिडीओ व्हायरल

या संपूर्ण कारवाईचा व्हिडीओ ग्रेटर नोएडा वेस्ट या ऑफिशियल अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. कारवाई वेळी अभिनेता चंद्रचूड स्वत: घटनास्थळी उपस्थित असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्याने सफेद टी शर्ट आणि शॉर्टस घातले आहे. यावेळी तो शांतपणे डीटीपी कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना दिसत आहे.

घर सुरक्षित

चंद्रचूड अधिकाऱ्यांकडे जातो आणि त्यांच्या हातात हात घेतो. यावेळी तो अधिकाऱ्यांशी इंग्रजीत संवाद साधताना दिसत आहे. घर सुरक्षित आहे, हेच महत्त्वाचे आहे, असं तो म्हणतो. त्यावर समोरचा अधिकारीही त्याला घर सुरक्षित आहे. बिल्कुल सुरक्षित आहे, असं म्हणताना दिसत आहे.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
'मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश'
आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया