AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG Weather Report : पाऊस दुसऱ्या सामन्यातही तुफान बॅटिंग करणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IND vs ENG 2nd T20i Weather Report : इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पहिला टी 20i सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने चाहत्यांची निराशा झालीय. त्यात आता पाऊस दुसऱ्या सामन्याचाही गेम करणार का? जाणून घ्या सामन्यादरम्यान हवामान कसं असेल.

IND vs ENG Weather Report : पाऊस दुसऱ्या सामन्यातही तुफान बॅटिंग करणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
Riverside Ground, Chester leStreet Eng vs IndImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 03, 2026 | 11:10 PM
Share

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील दुसऱ्या टी 20I सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. सामन्याला आता 24 तासांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. दुसरा टी 20I सामना शनिवारी 4 जुलैला होणार आहे. सामन्याचं आयोजन हे मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डमधील मैदानात करण्यात आलं आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 1 जुलैला आयोजित करण्यात आला होता. मात्र पावसाने सामन्याची वाट लावली. सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे चाहत्यांना दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा आहे. या निमित्ताने दुसऱ्या सामन्यात हवामान कसं असेल? पावसाची किती शक्यता आहे? हे जाणून घेऊयात.

मँचेस्टरमध्ये हवामान कसं असणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसऱ्या टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर इंग्लंडमध्ये सामन्यातील पहिला चेंडू हा दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी टाकण्यात येणार आहे. मँचेस्टरमध्ये दुपारी अडीच वाजता पाऊस होण्याची शक्यता ही 60 टक्के इतकी आहे. बीसीसीच्या अंदाजानुसार, 6 वाजता 67 टक्के, तर 4 वाजता पावसाची शक्यता ही 70 टक्के इतकी आहे. त्यामुळे आता पाऊस सामन्यात खोडा घालून मजा घालवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संजू सॅमसनबाबत निर्णय काय?

टीम इंडियाचा प्रमुख आणि अनुभवी फलंदाज संजू सॅमसन याच्या मालिकेतील उर्वरित सामन्यातील कामगिरीकडे लक्ष असणार आहे. संजू सॅमसन याने भारताला टी 20I वर्ल्ड कप जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. त्यामुळे संजूला सहजासहजी प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर करता येणार नाही. संजूला आयर्लंड विरूद्धच्या 2 आणि इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संजूला बाहेर करण्याची मागणी करण्यात येत आहे. संजूच्या जागी वैभव सूर्यवंशी याला पदार्पणाची संधी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता संजूबाबत काय निर्णय होतो? हे टॉसनंतर स्पष्ट होईल.

दरम्यान इंग्लंडने दुसऱ्या सामन्यासाठी नेहमीप्रमाणे काही तासांआधी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा प्लेइंग ईलेव्हन समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडची दुसऱ्या टी 20I सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन : फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक, जेकब बेथल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदील रशीद आणि जॉश टंग

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात