AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय

Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय

| Updated on: Jul 03, 2026 | 1:31 PM
Share

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम असून, हवामान विभागाने रायगड आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू असून, अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शहरातील विविध भागांमध्ये आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काल दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता, मात्र रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून आजही मुसळधार पाऊस कायम आहे. त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सततच्या पावसामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून, काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला आहे. नागरिकांना पावसामुळे दैनंदिन प्रवासात मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. यामुळे आगामी काळात शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, तसेच प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Jul 03, 2026 01:31 PM

Follow Us