Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे दुर्घटनांची मालिका सुरूच आहे, मीरा-भाईंदरमध्ये धावत्या स्कूटरवर नारळाचे झाड कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे दुर्घटनांची मालिका सुरूच आहे, मीरा-भाईंदरमध्ये धावत्या स्कूटरवर नारळाचे झाड कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ही घटना पश्चिम भाईंदरमधील राय गाव परिसरात घडली. मुसळधार पावसात स्कूटरवरून प्रवास करत असताना अचानक नारळाचे झाड स्कूटरस्वारावर कोसळले. या भीषण अपघातात राहुल पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे ठाणे आणि मुंबईतही झाडे कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. ठाण्यात आज पुन्हा झाड कोसळल्याची घटना घडली असून, कळवा येथील मनीषा नगर परिसरातही झाड पडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बोरिवली परिसरात रेल्वे रुळांवर झाडाची फांदी कोसळल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
या घटनांमुळे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या झाडांच्या छाटणीच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आवश्यक देखभाल आणि धोकादायक झाडांची छाटणी वेळेत झाली असती, तर अशा दुर्घटना टाळता आल्या असत्या, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
सतत घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Published on: Jul 03, 2026 02:50 PM
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय

