AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिंगपिसाट खरातच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! काळ्या मांजरीची का होतेय चर्चा? काळजाचा ठोका चुकवणारी माहिती उघड

अशोक खरातचे काळे कारनामे समोर आले आहेत. आता या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. खराच्या मिरगाव येथील फार्महाऊसवर काळ्या मांजरी दिसल्या.

लिंगपिसाट खरातच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! काळ्या मांजरीची का होतेय चर्चा? काळजाचा ठोका चुकवणारी माहिती उघड
अशोक खरातImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 28, 2026 | 8:03 PM
Share

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करुन बलात्कार केल्याचा गुन्हा खरातवर दाखल करण्यात आला. तसेच त्याचे अनेक महिलांसोबतचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले. अशोक खरातने माझ्याकडे दैवी शक्ती आहे असे म्हणत अनेकांना लुबाडले. त्याचे राजकीय कनेक्शन देखील समोर आले. अशोक खरातचे काळे कारनामे समोर आले आहेत. आता या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. खराच्या मिरगाव येथील फार्महाऊसवर काळ्या मांजरी दिसल्या.

भोंदूबाबा खरात यांच्या फार्महाऊस परिसरात काळ्या मांजरींचा मुक्त संचार होत असल्याचे धक्कादायक दृश्य टीव्ही ९ च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या दृश्याने परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून, भोंदूबाबा काळ्या प्राण्यांचा वापर करून भक्तांवर तंत्र-मंत्राचा प्रभाव टाकत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

फार्महाऊससमोर असलेल्या आमराईत आणि ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरातही काळ्या मांजरींचा निर्भय वावर दिसून येतो. भोंदूबाबा खरात यांच्याकडे यापूर्वीही नाग, वाघाची कातडी, हरणाची कस्तुरी अशा अनेक वादग्रस्त वस्तूंचे प्रकरण समोर आले होते. आता या काळ्या मांजरींच्या मुद्द्याने त्यांच्या अघोरी विद्या आणि कथित तंत्र-मंत्राच्या प्रकरणाला नवी उभारी मिळाली आहे.

खरातने जादूटोणा आणि भविष्याच्या नावाखाली अनेक महिलांचे मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भोंदू बाबा साध्या चिंचोक्यांना पॉलिश करून ते भविष्यातील संकटे निवारणारे ‘रत्ने’ किंवा ‘खडे’ असल्याचे भासवत असे. एका खड्याची किंमत १० हजार ते ७ लाख रुपयांपर्यंत लावून त्याने सर्वसामान्य भाविकांची मोठी लूट केली. लोकांच्या भावनांशी खेळून आणि रोगांवर गुणकारी औषध देण्याच्या बहाण्याने या भामट्याने कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अशोक खरात याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी. तसेच, या प्रकरणात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी निष्पक्ष आणि कठोर तपास करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा सिन्नर यांनी केली आहे.

अंधश्रद्धेचा धंदा?

अघोरी विद्या आणि तंत्र-मंत्र करणारे कथित बाबा भाविकांवर प्रभाव टाकण्यासाठी काळ्या प्राण्यांचा वापर करतात, असे जाणकार सांगतात. काळ्या मांजरींच्या माध्यमातून भिती आणि गैरसमज पसरवून भोळ्या-भक्तांना लुटण्याचा प्रकार सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. काळ्या मांजरी आणि काळ्या प्राण्यांबाबत समाजात खूप मोठी अंधश्रद्धा आहे. याच अंधश्रद्धेचा फायदा घेत काही भोंदू बाबा भाविकांची लूट करत असल्याचे दिसून येते.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात