तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो, माझं चुकलं का?; MPSC आंदोलनात ओमराजेंचा सवाल, पण विद्यार्थ्यांकडून ‘गो बॅक’च्या घोषणा
Omraje Nimbalkar On MPSC Protest: MPSC आंदोलनात ओमराजेंनी मोठं आश्वासन दिले आहे. अध्यक्षांच्या राजीनाम्याचा विषय घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटतो, असं ते म्हणाले आहेत.

पुण्यात एपीएमसी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी शिवसेना शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे गेले होते. त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आहे. तसेच त्यांच्या मागण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यावेळी तेथील विद्यार्थ्यांनी ओमराजे निंबाळकरांना परत जा अशा घोषणा दिल्या आहेत. यामुळे आता याची जोरदार चर्चा रंगत आहे.
ओमराजे निंबाळकर म्हणाले की, तुमची परीक्षा आयुष्यभरासाठी आहे. आमची निवडणूक 5 वर्षांपुरती आहे. आमच्या पेक्षा तुमच्या यातना खुप जास्त आहे. मला तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहचवायच्या आहेत. सर्वसामान्य माणसांसोबत माझा कनेक्ट आहे, असं ते म्हणाले. यावेळी काही मुलांनी एकनाथ शिंदेंना फोन लावून राजीनामा मागा, अशी मागणी ओमराजे निंबाळकरांकडे केली.
ते म्हणाले की, तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो माझं चुकलं का? मी तुमची भावना 100% सरकारपर्यंत पोहचवेल. एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा कोणाला घेता येतो? यानंतर ओमराजेंचे भाषण सुरू असताना गो बॅकच्या विद्यार्थ्यांकडून घोषणा देण्यात आल्या. यानंतर ओमराजे निंबाळकर म्हणाले की, काही झाले तेव्हा मी सामान्य माणसाची साथ सोडली नाही. ओमराजे मी असाच झालो नाही. धडका घेऊन झालो आहे.
त्यांनी सांगितले की, पक्षांतरांचा विषय प्रामाणिक सांगायचा आहे. २४ तास मतदारसंघासाठी खपत आहे. त्या मतदारसंघात जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आमची एक पंचायत समिती यायची लायकी नव्हती का? सत्यशिवाय माणसं काम करू शकत नाही. यामुळे आमचा पराभव झाला. राजीनाम्यासंदर्भात तुमचा विषय घेऊन मी सीएम साहेबांना भेटून विनंती करेन. तुमची मागणी आहे स्पर्धा परीक्षेच्या अध्यक्षाची राजीनामाची, ती मी सरकारपर्यंत पोहचवेन. तुमचा विषय घेऊन मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटतो. तुमची मागणीच्या कारवाई करता येईल यासाठी विनंती करतो, असं आश्वासन ओमराजे निंबाळकरांनी दिले आहे.
तर याआधी अभिजीत दिपके म्हणाले होते की, आपल्या देशाची परिस्थिती सध्या अशी आहे जो शिकलेला आहे ज्याच्याकडे डिग्री आहे ते रस्त्यावरती बसले आहेत. ज्याच्याकडे डिग्री नाही ते खुर्चीवरती बसले आहेत. शिक्षणाची जाणीव नाही. शिक्षणाची कदर नाही कोणाला. भाषण मी आणखी शिकत आहे. विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद साधू. मी काय मार्गदर्शन करु हे माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहे. त्या खुर्चीत बसल्यांपेक्षा जास्त आहे. जशा बोल्या लावतात तसेच करा ना. जो जास्त पैसा देणार त्यालाच जागा द्यावा.
