AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन कपड्यांची छोटीशी इच्छा… तीही अधुरी राहिली; शेतकऱ्याच्या शाळकरी मुलाचं टोकाचं पाऊल, परभणीतील घटनेनं काळीज हेलावलं

परभणीच्या एका गावात सहलीला जाण्यासाठी नवीन कपडे नसल्याच्या विवंचनेतून 14 वर्षीय मुलाने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. सोयाबीनचे पैसे आल्यानंतर कपडे घेऊन देण्याचं वडिलांनी आश्वासन दिलं होतं, मात्र...

नवीन कपड्यांची छोटीशी इच्छा... तीही अधुरी राहिली; शेतकऱ्याच्या शाळकरी मुलाचं टोकाचं पाऊल, परभणीतील घटनेनं काळीज हेलावलं
parbhani farmer son newsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 12:26 AM
Share

निसर्गाचा लहरीपणा आणि पिकाला न मिळणारा भाव अन् दुष्काळ यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. याच हलाखीच्या परिस्थितीचे आता थेट शेतकऱ्यांच्या मुलांच्या भावविश्वावर भयंकर परिणाम होऊ लागले आहेत. परभणी जिल्ह्यातील एका गावात अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी विदारक घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या सहलीला जाण्यासाठी नवे कपडे घेता न आल्याच्या नैराश्यातून एका १४ वर्षीय शाळकरी मुलाने आपलं आयुष्य संपवलं आहे. एका बाजूला पैसा नाही आणि दुसऱ्या बाजूला मुलाचे हट्ट पुरवण्याची ऐपत नाही, अशा कोंडीत सापडलेल्या शेतकरी बापाचा आक्रोश काळीज चिरणारा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या गावात राहणाऱ्या एका शेतकऱ्याचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या १४ वर्षांच्या मुलाच्या शाळेची सहल जाणार होती. सहलीला जाण्यासाठी त्याला नवीन कपड्यांची आस लागली होती. त्याने वडिलांकडे नव्या कपड्यांचा हट्ट धरला. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. खिशात पैसे नसताना हट्ट कसा पुरवायचा, हा मोठा प्रश्न पित्यासमोर होता. त्यांनी मुलाची समजूत काढत, “सोयाबीनचे पैसे आले की तुला नक्की नवीन कपडे घेऊन देईन,” असं मायेने आश्वासन दिलं.

मुलगा सोयाबीनचे पैसे येण्याची वाट पाहू लागला. मात्र, सहलीचा दिवस जवळ येऊनही हातात पैसे आले नाहीत. पैशांची जुळवाजुळव न झाल्याने वडिलांना लेकाला दिलेला शब्द पाळता आला नाही. नवे कपडे न मिळाल्याने मित्रांसोबत सहलीला कसं जायचं, या विचाराने मुलाच्या कोवळ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. गरिबीच्या याच विवंचनेतून आणि नैराश्याच्या भरात या १४ वर्षीय निष्पाप जीवाने थेट मृत्यूलाच कवटाळलं.

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचा फटका आता त्यांच्या पुढच्या पिढीला कसा बसत आहे, हे या दुर्दैवी घटनेतून विदारकपणे समोर आलं आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात