Sanjay Raut | अशोक खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, संजय राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत असून, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भोंदूगिरी, तंत्र-मंत्र आणि इतर गंभीर आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या अशोक खरात यांच्या संपर्कात अनेक बडे नेते होते, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत असून, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भोंदूगिरी, तंत्र-मंत्र आणि इतर गंभीर आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या अशोक खरात यांच्या संपर्कात अनेक बडे नेते होते, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, “जर सरकार अशोक खरात यांच्या पाठीशी नसते, तर त्यांच्या ठिकाणी जाणाऱ्या सुमारे 40 आमदार, खासदार आणि मंत्र्यांची यादी सरकारने जाहीर केली असती.” यावेळी त्यांनी पुढे म्हटले की, “भोंदूबाबापेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी हे अधिक मोठे गुन्हेगार आहेत.” त्यामुळे या सर्व संबंधितांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, इतर गुन्ह्यांमध्ये सहआरोपींना चौकशीसाठी बोलावले जाते, त्यांना अटक केली जाते, याचा उल्लेख करत राऊत यांनी सवाल उपस्थित केला की, या प्रकरणात संबंधित नेत्यांना चौकशीसाठी का बोलावले जात नाही? याच संदर्भात त्यांनी काही नेत्यांची नावे घेत, “दीपक केसरकर, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांना चौकशीसाठी बोलावले आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणावरून आता राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, सरकार यावर काय भूमिका घेते आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Mar 29, 2026 11:02 AM
मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा
फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच
आणखी एका नेत्याची जीभ घसरली, थेट म्हणाले, रस्त्यावर उतरूनकाय उXXX...

