AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेईई अ‍ॅडव्हान्स्ड 2026 : अर्ध कधी भरायचा? परीक्षा कधी? वेळापत्रक घ्या जाणून

जेईई अ‍ॅडव्हान्स्ड 2026 ची परीक्षा 17 मे 2026 रोजी होणार असून, अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू होईल. यंदा आयआयटीसोबतच आयआयएससी (बंगळूर) मध्येही प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. जेईई मेनच्या टॉप 2.5 लाख रँकर्सनाच ही परीक्षा देता येते. पात्रता निकष, शुल्क आणि ऑनलाइन (CBT) परीक्षा पद्धतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

जेईई अ‍ॅडव्हान्स्ड 2026 : अर्ध कधी भरायचा? परीक्षा कधी? वेळापत्रक घ्या जाणून
JEE AdvancedImage Credit source: social media
| Updated on: Mar 09, 2026 | 3:05 PM
Share

जेईई अ‍ॅडव्हान्स्ड 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुडकी” ने परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं असून यंदा प्रवेश प्रक्रियेतही एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. अधिकृत माहितीनुसार, JEE Advanced 2026 परीक्षा 17 मे 2026 रोजी होणार आहे. परीक्षा एकाच दिवशी दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. पेपर-1 सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत, तर पेपर-2 दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत होईल. दोन्ही पेपर देणे उमेदवारांसाठी अनिवार्य आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने एक पेपर सोडला तर त्याला मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळणार नाही.

आयआयटी, आयआयएससी प्रवेश

वेळापत्रकानुसार, जेईई अ‍ॅडव्हान्स्ड 2026 साठी नोंदणी प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू होईल आणि 2 मे 2026 रोजी संपेल. तर परदेशी नागरिकांसाठी अर्ज प्रक्रिया 6 एप्रिलपासून सुरू होणार आहे. सर्व अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइट “जेईई अ‍ॅडव्हान्स्डची अधिकृत वेबसाइट” (jeeadv.ac.in) वर ऑनलाइन केली जाणार आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत आणखी एक मोठा बदल म्हणजे, जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या गुणांच्या आधारे आता भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू येथे प्रवेशाची संधी. उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आयआयटीसोबतच आणखी एका प्रतिष्ठित संस्थेत शिक्षण घेण्याचा मार्ग खुला झाला आहे.

JEE Advanced परीक्षा कोण देऊ शकतं?

या परीक्षेसाठी फक्त पात्र उमेदवारांनाच अर्ज करता येतो. सर्वप्रथम, JEE Main 2026 च्या पेपर-1 मध्ये टॉप 2,50,000 रँकमध्ये आलेले विद्यार्थीच जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेला बसू शकतात. याच विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची संधी दिली जाते. तसेच, उमेदवाराला ही परीक्षा सलग दोन वर्षांत जास्तीत जास्त दोन वेळाच देता येते. उमेदवाराने 2025 किंवा 2026 मध्ये पहिल्यांदाच 12वीची परीक्षा भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि गणित (Mathematics) या विषयांसह दिलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय, जे विद्यार्थी आधीच कोणत्याही “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये प्रवेश घेतलेले आहेत, ते जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र मानले जात नाहीत.

जेईई अ‍ॅडव्हान्स्ड 2026 साठी अर्जाचे नोंदणी शुल्क

1. भारतीय नागरिकांसाठी शुल्क :1. सर्व श्रेणीतील महिला उमेदवार: 1600 रुपये

2. एससी, एसटी आणि PwD (दिव्यांग) उमेदवार: 1600 रुपये

3. इतर सर्व उमेदवार: 3200 रुपये

OCI/PIO (भारत) उमेदवारांसाठी शुल्क :

1. महिला उमेदवार (GEN आणि GEN-PwD): 1600 रुपये

2. ओपन (GEN-PwD): 1600 रुपये

3. ओपन (GEN): 3200 रुपये

परदेशी नागरिक आणि OCI/PIO (विदेश) उमेदवारांसाठी शुल्क :

1. SAARC देशांमध्ये राहणारे उमेदवार: 100 अमेरिकन डॉलर

2. SAARC देशांबाहेरील उमेदवार: 200 अमेरिकन डॉलर

परीक्षा देण्याचं माध्यम कोणतं?

JEE Advanced परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर आधारित टेस्ट (CBT) पद्धतीने घेतली जाणार आहे. म्हणजेच ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपात होईल. CBT पद्धतीची सवय व्हावी यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरील “Resources” विभागात उपलब्ध असलेले मॉक टेस्ट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या सराव चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेचा फॉर्मॅट, प्रश्न सोडवण्याची पद्धत आणि वेळेचे व्यवस्थापन समजून घेण्यास मदत होते.

JEE Advanced अ‍ॅडमिट कार्ड

JEE Advanced 2026 परीक्षेसाठीचे अ‍ॅडमिट कार्ड 11 मे ते 17 मे 2026 दरम्यान डाउनलोड करता येतील. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून आपले अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंटेड कॉपी सोबत ठेवणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर जाताना अ‍ॅडमिट कार्डची प्रिंटेड कॉपी आणि एक वैध ओळखपत्र (Valid ID) घेऊन जाणे अनिवार्य आहे. अ‍ॅडमिट कार्डची सॉफ्ट कॉपी (मोबाइलवरील कॉपी) परीक्षा केंद्रावर स्वीकारली जाणार नाही.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.