10 भागांची सर्वात खतरनाक सीरिज, ओटीटीवर प्रदर्शित होताच बनली नंबर 1, IMDb रेटिंग 8.3
सध्या ओटीटीवर 10 भागांची सर्वात खतरनाक क्राइम सीरिज प्रदर्शित झाली आहे. ओटीटीवर येताच ती नंबर 1 बनली आहे. जिला IMDb वर 8.3 रेटिंग आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सध्या वेब सिरीज पाहण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रेक्षक घरबसल्या विविध प्रकारच्या कथा बघत आहेत. दमदार स्क्रिप्ट, मजबूत अभिनय आणि थरारक कथानकामुळे या सिरीज प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. साऊथ इंडियन कंटेंटला देशभरात मोठी लोकप्रियता मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच प्रदर्शित झालेली काट्टान ही क्राइम थ्रिलर सिरीज सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
लोकप्रिय अभिनेता विजय सेतुपति यांचा मुख्य भूमिका असलेली ही सिरीज 27 मार्च 2026 रोजी Jio Hotstar वर रिलीज झाली. सस्पेन्स आणि थराराने भरलेली ही सिरीज प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवते.
या सिरीजचे दिग्दर्शन एम मणिकंदन आणि बी अजितकुमार यांनी केले आहे. विजय सेतुपती यांच्यासोबत मिलिंद सोमन, सुदेव नायर, कलैवानी भास्कर, मुथुकुमार, वीजे पार्वती, रिशा जैकब्स, मोनिका आणि वडिवेल मुरुगन यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
‘काट्टान’ची कथा विजय सेतुपती यांनी साकारलेल्या ‘मुथु’ या व्यक्तिरेखेभोवती फिरते. काही लोक त्याला नायक मानतात, तर काहीजण राक्षस किंवा चमत्कारिक व्यक्ती म्हणून पाहतात. कथेची सुरुवात होते ती तमिळनाडूमधील एका पोलीस स्टेशनजवळ सापडलेल्या एका कापलेल्या डोक्यापासून, ज्यामुळे एक गूढ आणि गुंतागुंतीची चौकशी सुरू होते. एका दुर्गम गावाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा पर्यावरणाशी संबंधित संघर्ष आणि सत्याच्या शोधाला जोडणारी आहे.
ओटीटीवर येताच बनली नंबर 1
या सिरीजमध्ये एकूण 10 भाग असून प्रत्येक भाग सुमारे 40 ते 45 मिनिटांचा आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये नवा ट्विस्ट असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहते. संपूर्ण सिरीज सुमारे पाच तासांपेक्षा अधिक कालावधीची आहे.
ही सिरीज सध्या हिंदी डबिंगसह Jio Hotstar वर उपलब्ध आहे. रिलीज होताच ती टॉप ट्रेंडिंगमध्ये स्थान मिळवत नंबर 1 वर पोहोचली आहे. तसेच, IMDb वर या सिरीजला 8.3 इतकी चांगली रेटिंग मिळाली आहे.
दरम्यान, सस्पेन्स, थरार आणि दमदार अभिनय असणारी ही ‘काट्टान’ ही सिरीज ओटीटीवर पाहण्यासारखी ठरली असून क्राइम थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ती एक परफेक्ट मनोरंजन पॅकेज आहे.
