tv9 Marathi Special Report | माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
मागील काही काळात अनेक वरिष्ठ नेते खरात यांच्या प्रभावाखाली असल्याची चर्चा होती. मात्र, सिन्नर मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे हे खरात यांना जुमानत नसल्याचे सांगितले जाते. याच कारणामुळे खरात यांनी कोकाटे यांना मंत्रीपद देऊ नये, असा कथित फोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या अशोक खरात यांच्याविरोधात गंभीर आरोप समोर येत आहेत. भोंदूगिरी, तंत्र-मंत्र यांसोबतच त्यांच्या कथित गैरप्रकारांमुळे आधीच वादग्रस्त ठरलेले खरात आता राजकारणात हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही काळात अनेक वरिष्ठ नेते खरात यांच्या प्रभावाखाली असल्याची चर्चा होती. मात्र, सिन्नर मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे हे खरात यांना जुमानत नसल्याचे सांगितले जाते. याच कारणामुळे खरात यांनी कोकाटे यांना मंत्रीपद देऊ नये, असा कथित फोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे.
दरम्यान, सिन्नर परिसरातील नागरिकांमध्येही याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, खरात याच्या पार्श्वभूमीची माहिती असल्यामुळे अनेकजण त्याच्यापासून आधीपासूनच दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सिन्नरचे आमदार कोकाटे आणि खरात यांच्यातील कोणताही फोटो किंवा व्हिडिओ अद्याप समोर आलेला नाही, असेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, खरात याने खरोखरच महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप केला होता का, याबाबत सखोल चौकशी होण्याची मागणी आता पुढे येत आहे.
Published on: Mar 29, 2026 09:59 AM
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..

