AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

tv9 Marathi Special Report | जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

| Updated on: Mar 29, 2026 | 10:26 AM
Share

भाजप नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री मंगल प्रभात लोढा हे एका पत्रामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जैन सणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस सिलेंडर तुटवड्याची दखल घेत लोढा यांनी जैन संघटनांना पत्र लिहून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

भाजप नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री मंगल प्रभात लोढा हे एका पत्रामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जैन सणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस सिलेंडर तुटवड्याची दखल घेत लोढा यांनी जैन संघटनांना पत्र लिहून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या पत्रामध्ये “तुम्हाला जी काही कमतरता भासेल ती कळवा, ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन,” असे नमूद करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, या भूमिकेमुळे विरोधकांकडून तसेच काही नागरिकांकडून टीका होत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत सध्या गॅस टंचाईची समस्या जाणवत असून, विशेषतः पूर्णपणे गॅसवर अवलंबून असलेल्या लहान-मोठ्या व्यवसायांना त्याचा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आल्याचेही सांगितले जात आहे.
अशा परिस्थितीत लोढा यांनी केवळ जैन संस्थांच्या गॅस तुटवड्याबाबत पुढाकार घेतल्याचे दिसत असल्याने “ते सर्वसामान्यांचे मंत्री आहेत की फक्त एका विशिष्ट समाजाचे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, राज्यातील गॅस टंचाईच्या प्रश्नावर सरकार कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Mar 29, 2026 10:26 AM
Follow Us