केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही, दीपक केसरकर यांचा बचाव
खरात प्रकरणात केवळ राजकीय द्वेषापोटी आपल्यावर आरोप केले जात असून आपण या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेत असल्याचे शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणे म्हणजे त्या व्यक्तीच्या कृत्यात सहभागी असणे असे होत नाही. अशोक खरात याच्या सोबतचे माझे फोटो आहेत. म्हणजे त्या व्यक्तीने केलेल्या कृत्यात माझा सहभाग नाही. मी कोणत्याही महिलेची खरात याच्या सोबत ओळख करुन दिलेली नाही. मात्र, माझी बदनामी विशेषत: उबाठा गटाकडून सुरु आहे.संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाच्या महिला अध्यक्षा माझ्यावर आरोप करीत आहेत, त्यामुळे खुलासा करण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतली असल्याचे शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली,त्यावेळी राज्यात संघर्ष होईल अशी विधाने संजय राऊत करत होते. मात्र, मी राज्यात मांडलेल्या भूमिकेमुळे शिवसैनिक आमच्या सोबत आले. त्याचा राग काढण्यासाठी माझी बदनामी सुरु असल्याचेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. माझ्याकडे एखादी तक्रार आली असती आणि मी दखल घेतली नसती त्यांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न मी केला असता तर गोष्ट वेगळी होती.मात्र असेही काहीही घडलेले नाही. केवळ ओळख असल्याने ते करत असलेल्या वाईट कृत्याशी आपला संबंध जोडणे योग्य नव्हे. त्यांच्या नेत्यांनी पाणी आणून दिले, मंदिराला निधी दिला ते लोक असे आरोप करत आहेत. म्हणजे त्यांनी केले ते योग्य आणि दुसऱ्याने केले तर वाईट असे होऊ शकत नाही असेही केसरकर यांनी सांगितले. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मी माझी बदनामी करणाऱ्यावर काय कारवाई करायची याचा कायदेशीर सल्ला घेणार असल्याचेही केसरकर यांनी म्हटले आहे.
Published on: Mar 28, 2026 06:39 PM
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला

