AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?

Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?

| Updated on: Nov 24, 2026 | 10:48 AM
Share

कुलाब्यात शिंदे गटाच्या एका शाखाप्रमुखाने निवडणुकीसाठी 50 लाख रुपये मिळाल्याचा दावा करणाऱ्या व्हिडिओवर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी हा पैसा कोणी दिला, याचा स्रोत काय, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत भ्रष्टाचारविरोधी यंत्रणांनी चौकशी करण्याची मागणी केली.

संदीप देशपांडे यांनी नुकत्याच ट्वीट केलेल्या एका व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये शिंदे शिवसेनेचा एक शाखाप्रमुख गेल्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भात बोलताना दिसत आहे. सदर शाखाप्रमुख एका बॉक्समध्ये नोटांची बंडले असल्याचे दाखवत असून, एका मोठ्या नेत्याने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे 50 लाख रुपये पाठवल्याचे तो सांगत आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. “हे सगळे पैशाने विकत घेतले जाणारे लोक आहेत,” असे राऊत म्हणाले. त्यांनी कुलाब्यातील महायुतीच्या त्या मोठ्या नेत्याचे नाव उघड करण्याची मागणी केली, ज्याचा महानगरपालिका निवडणुकीशी थेट संबंध होता.

राऊत यांनी आपल्या अटकेचा दाखला देत, “फक्त 50 लाखाच्या व्यवहारावरून ईडीने मला तुरुंगात टाकले होते,” असे सांगितले. त्यामुळे या 50 लाख रुपयांच्या व्यवहाराची अँटी करप्शन आणि ईडीने तातडीने चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित कार्यकर्त्यानेच पैसे देणाऱ्या व्यक्तीचे नाव सामाजिक हितासाठी उघड करावे, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.

 

Published on: Nov 24, 2026 10:48 AM

Follow Us