AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...

Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले…

| Updated on: Nov 24, 2026 | 9:44 AM
Share

सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) निधीच्या वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आमदारांनी आणि खासदारांनी या निधीवर हक्क सांगण्याऐवजी तो जिल्हा परिषद सदस्यांना मिळावा, अशी त्यांची भूमिका आहे. सरकार कॉन्ट्रॅक्टरधार्जिणं असून जनतेच्या हितापेक्षा कंत्राटदारांना प्राधान्य देत असल्याचा आरोप करत, त्यांनी डीपीसी रद्द करण्याची मागणी केली.

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) च्या निधी वाटपावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदारांनी आणि खासदारांनी या निधीवर हक्क सांगण्याऐवजी तो जिल्हा परिषद सदस्यांना मिळाला पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. डीपीसी म्हणजे जिल्ह्याच्या नियोजन समितीचे कार्यक्षेत्र असल्याने, स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांनाच त्याचे नियोजन करण्याचा अधिकार असावा, असे पाटील यांचे म्हणणे आहे.

सतेज पाटील यांनी सरकारच्या संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील असून, त्यांना पुरेशी मदत मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला. भुदरगड येथे पहाटे पाच वाजता शक्तीपीठ रस्त्याच्या मोजणीसाठी पोलीस ताफा घेऊन येण्याचा प्रकार, तसेच ५५ पंप हाऊस सारखे प्रकल्प रेटणे हे सरकार कॉन्ट्रॅक्टरधार्जिणं असल्याचे दर्शवते, असे ते म्हणाले. सरकार १३ कोटी जनतेऐवजी कंत्राटदारांना प्राधान्य देत असल्याचा आरोप करत, पाटील यांनी जर राज्यातूनच निर्णय घ्यायचा असेल तर डीपीसी रद्द करा, अशी मागणी केली.

 

Published on: Nov 24, 2026 09:44 AM

Follow Us