Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज – सूत्र
रोहित पवारांनी जाहीर केलेल्या ट्रॅक्टर मोर्चामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि सुप्रिया सुळे यांना विश्वासात न घेता मोर्चाची घोषणा करण्यात आल्याने ही नाराजी वाढली आहे. याबाबत 26 तारखेला मुंबईत जिल्हाध्यक्षांची महत्त्वाची बैठक होणार आहे.
रोहित पवार यांनी जाहीर केलेल्या ट्रॅक्टर मोर्चामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे सूत्रांकडून समजते. पक्षाच्या वरिष्ठांना विश्वासात न घेता मोर्चाची घोषणा केल्याने ही नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. नागपूरमधील पत्रकार परिषदेबाबतही वरिष्ठांना माहिती देण्यात आली नव्हती, असेही सूत्रांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेमध्ये शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो नसल्यानेही नाराजी व्यक्त केली जात आहे. नागपुरातील पत्रकार परिषदेनंतर सुप्रिया सुळे यांनी सलील देशमुख यांना फोन करून आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
या पार्श्वभूमीवर, 26 तारखेला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्षांना पक्ष कार्यालयातून या बैठकीसाठी फोन करण्यात आले आहेत. या बैठकीमध्ये रोहित पवारांच्या मोर्चावर आणि पक्ष संघटनेच्या भूमिकेवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
Published on: Nov 24, 2026 09:06 AM
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....

