आमची जमीन परत द्या, खरातला मंदिरासाठी जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याने त्याच्या फॉर्म हाऊस आणि ईशान्येश्वर मंदिरासाठी ज्यांची जमीन धाकदपटशाही दाखवून कवडीमोल दरात विकत घेतली होती ते माळी बंधूंनी आता ही जमीन परत मागितली आहे.
नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याचे कारनामे जसजसे पुढे येत आहेत. तसतसे त्याने फसवणूक केलेली मंडळी आता कॅमेऱ्यासमोर येत आहेत. आता भोंदू अशोक खरात याला ईशान्येश्वर मंदिर आणि फार्म हाऊससाठी जमीन विकणारे शेतकरी माळी बंधू कॅमेऱ्यासमोर आले आहेत. आमची अडचण होती म्हणून ही जमिन विकण्यासाठी आम्ही अशोक खरात याच्याशी संपर्क केला होता. मात्र, खरात याने ही जमीन तुम्हाला फळणार नाही. तुमच्या पैकी दोघा भावांचा मृत्यू होईल, त्यामुळे ही जमिन तुम्ही मलाच विका अशी भिती दाखवल्याचे माळी बंधूंनी म्हटले आहे. आम्हाला ठरल्या प्रमाणे पैसे मिळाले नाहीत. त्यावेळी भोंदू अशोक बाबाचे प्रस्थ मोठे होते. त्यामुळे आम्ही कोणाकडे तक्रार केली नाही असेही माळी बंधूंनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले.
Published on: Mar 28, 2026 01:39 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

