तटकरे-चाकणकर यांना सहआरोपी करा,सीडीआर तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
राष्ट्रवादीचे सिन्नरचे नेते माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद देऊ नये अशी मागणीही खरात याने सुनील तटकरे यांना केली होती असा आरोपही शरद पवार गटाच्या या नेत्याने केला आहे.
नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे.रुपाली चाकणकर या भोंदूबाबा अशोक खरात याच्या ट्रस्टवर होत्या. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर वारंवार नाशिकला विमानाने येऊन खरातला भेटत होते. त्यामुळे या दोघांना सह आरोपी करुन त्यांची चौकशी केल्याशिवाय या प्रकरणातील तक्रारदार पुढे येणार नाहीत अशी मागणी शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी केली आहे. खरात आणि या नेत्यात कोणते व्यवहार झाले याची माहिती काढण्यासाठी सुनील तटकरे आणि चाकणकर या तिघांचे सीडीआर तपासावेत अशी मागणी लवांडे यांनी केली आहे.
Published on: Mar 28, 2026 01:12 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

