AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन

नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन

| Updated on: Mar 28, 2026 | 3:53 PM
Share

नाशिकच्या सातपुर परिसरातील शिवाजीनगरात एक बिबट्या रहिवाशी भागात शिरल्याने त्याची सुटका करताना वनविभागाची चांगलीच दमछाक झाली. हा बिबट्या अशा अवघड जागी जाऊन बसला होता, की त्याला बेशुद्ध करताना अनेक अडचणी आल्या.अखेर ही मोहिम यशस्वी झाली.

नाशिकच्या सातपुर परिसरातील शिवाजीनगरात एक बिबट्या रहिवाशी भागात शिरल्याने खळबळ उडाली होती. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवले. सुरुवातीला बिबट्या झाडी झुडपात लपला होता. त्याला जेरबंद करण्यासाठी जेसीबीने झाडे हटवण्यात आली. इतक्या हा बिबट्या एका गेस्टहाऊसच्या मागच्या बाजूकडील खिडकीत अवघड जागी लपून बसला. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने त्याला बंदुकीतून गुंगीचे इंजेक्शन दिले गेले. या बिबट्याला बेशुद्ध झाल्यानंतर वनविभागाने पकडून हे रेस्क्यु ऑपरेशन अखेर यशस्वीपणे पूर्ण केले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी अनेक तासांपासून हे रेस्क्यु ऑपरेशन राबवण्यात आले. बिबट्याला पकडण्यात यश आल्याने येथील रहिवाशांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Published on: Mar 28, 2026 03:41 PM
Follow Us