सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
जळगावात सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने आणि चांदी दरात वाढ झाली असल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 600 रुपयांची तर चांदीच्या दरात 3 हजार रूपयांची वाढ झाली आहे. आता या दरवाढीमुळे सोन्याचा दर हा आता जीएसटीसह 1 लाख 50 हजार 380 रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. तर चांदीचा दर एका किलोमागे जीएसटीसह 2 लाख 39 हजार 990 रुपये इतका झाला आहे. महिनाभरापासून प्रचंड घसरण होत असलेल्या सोन्या आणि चांदीच्या दरात गेल्या सहा दिवसात मोठी वाढ झाली आहे. अवघ्या सहा दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 11 हजार 500 रुपयांची वाढ झाली असून सोन्याने पुन्हा दीड लाखांचा आकडा गाठला आहे. चांदीच्या दरात देखील सहा दिवसात तब्बल 20 हजार रुपयांची वाढ झाली आहे. अनेक दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत असल्यामुळे चिंतेत असलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. पुढच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात आणखी भाव वाढू होऊ शकते. यामुळे सराफ बाजारात सोने चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे
Published on: Mar 28, 2026 04:10 PM
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला

