ऋषी कपूर यांच्यावर गंभीर आरोप करणारी मराठमोळी अभिनेत्री तब्बल 37 वर्षांपासून गायब… एकेकाळी एका रात्रीत आलेली प्रसिद्धीझोतात
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण 37 वर्षांपासून गायब असलेल्या या अभिनेत्रीच्या शोधात स्वतः ऋषी कपूर होते... त्यांच्यावर एकेकाळी अभिनेत्रीने गंभीर आरोप केलेले... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक धक्कादायक घटना घडत असतात, ज्या समोर आल्यानंतर खळबळ माजते… बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री जी, एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आली. पण त्यानंतर ती कुठे आहे आणि काय करते याबद्दल कोणालाच काहीही माहिती नाही. अभिनेत्रीने दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर करियर उद्ध्वस्त करण्याचे आरोप देखील केले होते. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री काजल किरण आहे. 1977 साली प्रदर्शित झालेल्या ‘हम किसी से कम नही’ सिनेमातून अभिनेत्रने ऋषी कपूर यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अचानक अभिनेत्री सर्वांच्या नजरेतून दूर झाली. खुद्द ऋषी कपूर यांनी देखील अभिनेत्रीला शोधण्याचा प्रयत्न केला.
काजल किरण हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिचं खरं नाव सुनीता कुलकर्णी होतं. एका मुलाखतीत ऋषी कपूर म्हणालेले, ‘काजल हिचा जन्म मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तिने स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. काजल हिला डॉक्टर व्हायचं होतं, पण तिच्या नशिबात झगमगतं विश्व होतं…’
ऋषी कपूर यांच्यावर काजल हिने केलेले गंभीर आरोप…
‘हम किसी से कम नही’ सिनेमात तर हीट ठरला, पण त्याचा कोणताच फायदा काजल हिला झाला नाही… परिणामी काजल हिला काम मिळणं देखील हळू हळू बंद झालं. यामुळे अभिनेत्रीने ऋषी कपूर यांना कारणीभूत ठरवलेलं होतं… ऋषी कपूर यांच्यामुळे माझी प्रगती झाली नाही… असा दावा काजल हिने केलेला. सांगायचं झालं तर, त्याकाळी चाहत्यांमध्ये ऋषी कपूर यांची इमेज रोमाँटिक हिरो अशी होती आणि यामध्ये कजाल हिने साकारलेली भूमिका चाहत्यांपर्यंत पोहोचलीच नाही…’, अभिनेत्रीने केलेल्या आरोपांवर ऋषी कपूर यांनी देखील स्वतःची भूमिका मांडली होती.
स्पष्टीकरण देत ऋषी कपूर म्हणालेले… ‘काजल हिचं नशीब वाईट होतं. तेव्हा अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि जया प्रदा यांनी देखील नुकताच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि त्या त्यांच्या करियरमध्ये यशस्वी देखील ठरल्या…’, असं म्हणत त्यांनी सर्व आरोप फेटाळले…
आता कुठे आणि काय करत काजल किरण?
ऑस्कर झर मोहम्मद या व्यक्तीने यावर मोठा खुलासा केलेला, सुनीता कुलकर्णी, जी काजल किरण नावानेही ओळखली जाते, नेदरलँड्स (द हेग) येथे राहत असून तिला मीनाक्षी व सुदक्षिनी नावाच्या दोन मुली आहेत. तिचं लग्न एका डच व्यक्तीशी झालं असून त्या सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. सांगायचं झालं तर, ही माहिती 2018 सालची आहे.
