AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचा टप्प्यात कार्यक्रम, किम जोंगने उडवली जगाची झोप, थेट अमेरिकेला लक्ष्य करत..

इराण आणि अमेरिका युद्धात पुन्हा एकदा अमेरिकेचे टेन्शन वाढले आहे. उत्तर कोरियाने अमेरिकेला धक्का दिला. अमेरिकेवरील संकटे काही जाण्याचे नाव घेत नाही. उत्तर कोरियाच्या या चाचणीने जग तणावात आहे.

अमेरिकेचा टप्प्यात कार्यक्रम, किम जोंगने उडवली जगाची झोप, थेट अमेरिकेला लक्ष्य करत..
Kim Jong Un
| Updated on: Mar 29, 2026 | 11:30 AM
Share

इराण युद्धामुळे अगोदरच अमेरिकेला नाकीनऊ आलेत. कोणत्याही स्थितीत इराण माघार घेत नाही आणि एकही देश अमेरिकेच्या मदतीला पुढे येत नाही. इराणकडून अमेरिकेच्या सैन्याला टार्गेट करत हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच अमेरिकेचे लष्कर इराणच्या जमिनीवर उतरून कारवाई करू शकते, असे सांगितले जात असतानाच इराणकडून अमेरिकेच्या सैन्याचे वेलकम करण्यात आले आणि नरकात स्वागत असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिका 6 एप्रिलपर्यंत हल्ला करणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांच्या सैन्याकडून जोरदार तयारी सुरू आहे. इराणने मोठा इशारा देत सांगितले की,आम्ही प्रत्येक हल्ल्यासाठी तयार आहोत. इराणकडून होर्मुज खाडी पूर्णपणे सुरू करण्यात आली नाही. अमेरिका, इस्त्रायल आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या देशांचे जहाज होर्मुजमधून जाऊ देणार नसल्याची त्यांची भूमिका आहे. अमेरिकेने इराणमधील ग्राऊंट ऑपरेशनची तयारी सुरू केली.

इराण आणि अमेरिका युद्ध पेटलेले असतानाच आता अमेरिकेत खळबळ उडाली. अमेरिकेला मोठा धक्का बसला. एकीकडे इराणसोबतच्या युद्धाचे टेन्शन आहे तर दुसरीकडे आता उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अमेरिकेची धडधड वाढवली आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उनने पुन्हा एकदा जगाचेही टेन्शन वाढवले आहे. सरकारी मीडियाच्या रिपोर्टनुसार, रविवारी उत्तर कोरियाने उच्च क्षमता असलेल्या इंजनचे परीक्षण केले आणि ती चाचणी यशस्वी झाली.

या नवीन इंजिनच्या मदतीने उत्तर कोरिया आता अमेरिकेला थेटपणे टार्गेट करून हल्ले करू शकतो. थेटपणे हल्ले करणारी क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या दिशेने उत्तर कोरियाने पाऊले टाकली आहेत. किम जोंग उनने स्वत: ग्राऊंट जेट टेस्ट केले आहे. रिपोर्टनुसार, या नव्या अपग्रेड इंजनच्या कंपोजिट कार्बन फायबरचा वापर केला गेला आहे. या इंजिनची क्षमता 2500 किलोटन मोजली गेली.

गेल्या सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीपेक्षा 1971 किलोटन हे प्रमाण खूप जास्त आहे. संरक्षण तज्ञांच्या मते, इंजिनची शक्ती वाढवण्याचा मुख्य उद्देश एकाच क्षेपणास्त्राला लक्ष्य करणे हा आहे. उत्तर कोरियाने केलेल्या या परीक्षणानंतर जगाचे टेन्शन वाढले पण विशेष: अमेरिका अधिक तणावात असल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ