AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live शोमध्ये नको तेच घडलं, मॉडेल बोलताना झाली Oops Moment ची शिकार, तरीही ती थांबली नाही, Video व्हायरल

लाईव्ह शोमध्ये प्रसिद्ध मॉडेलसोबत घडलं असं काही की झाली Oops Moment ची शिकार. पण मॉडेलने न थांबता जे केलं त्याचं होतंय सर्वत्र कौतुक.

Live शोमध्ये नको तेच घडलं, मॉडेल बोलताना झाली Oops Moment ची शिकार, तरीही ती थांबली नाही, Video व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 28, 2026 | 12:29 PM
Share

Video Viral : सध्या सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल होण्यासाठी काही सेकंदच लागतात. फेसबुक, इंस्टाग्राम, X आणि स्नॅपचॅटसारख्या प्लॅटफॉर्मवर लोक मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याने प्रत्येक छोटी-मोठी घटना कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर पोहोचते. अशाच एका व्हिडिओने सध्या जोरदार चर्चा रंगवली आहे, ज्यात एका ब्यूटी पेजंट स्पर्धकाचा ‘Oops मोमेंट’ प्रचंड व्हायरल झाली आहे.

हा व्हिडिओ मिस थायलंड ब्यूटी पेजंटमधील आहे. यात स्पर्धक कामोलवान चानागो स्टेजवर प्रेझेंटेशन देताना दिसत आहे. बोलताना तिच्या तोंडातील नकली दात अचानक बाहेर आले. ज्यामुळे तिच्या अस्सल दातांची झलक सर्वांना दिसली. हा क्षण अनपेक्षित होता आणि काही क्षणांसाठी प्रेक्षकही थक्क झाले.

प्रेक्षकांकडून होतंय कौतुक

मात्र, या अवघड परिस्थितीतही कामोलवान चानागोने आपला आत्मविश्वास ढासळू दिला नाही. तिने शांतपणे चेहरा वळवून कोणतीही घाई न करता दात पुन्हा व्यवस्थित केले आणि लगेचच स्टेजवर आत्मविश्वासाने रॅम्प वॉक सुरू केला. गोल्डन शियर ड्रेस आणि फर गाऊनमध्ये ती अत्यंत आकर्षक दिसत होती.

तिच्या या प्रसंग हाताळण्याच्या पद्धतीने प्रेक्षक आणि सोशल मीडिया युजर्स प्रभावित झाले आहेत. अनेकांनी तिच्या धैर्याचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे. काहींनी कमेंटमध्ये लिहिले की, ती खंबीरपणे पुढे गेली, हेच महत्त्वाचं आहे, तर काहींनी मी असते तर कदाचित रडले असते, पण तिने खूप छान हाताळलं, अशी प्रतिक्रिया दिली.

या घटनेनंतर ब्यूटी पेजंटमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांवर परफेक्ट दिसण्याचा असलेला ताण यावरही चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या दबावावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ऑक्टोबर 2025 देखील अशीच घटना

याआधीही अशा धाडसी निर्णयांची उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये मिस यूएसए स्पर्धेतील स्पर्धक मेरी कॉमने एलोपेसिया या आजारामुळे केस गळाल्यानंतर विग न घालता थेट टक्कल अवस्थेत रॅम्प वॉक करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. तिच्या या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते.

दरम्यान, मिस थायलंड स्पर्धेचा अंतिम सोहळा 28 मार्च रोजी पार पडणार आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर कामोलवान चानागोची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली असून तिला जनतेकडून भरभरून पाठिंबा मिळताना दिसत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?