AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs SRH : विराट-देवदत्तची चाबूक खेळी, आरसीबीचा जबरदस्त विजय, हैदराबादचा 6 विकेट्सने धुव्वा

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Result : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या घरच्या मैदानात अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करत 19 व्या हंगामात विजयी सुरुवात केली आहे.

RCB vs SRH : विराट-देवदत्तची चाबूक खेळी, आरसीबीचा जबरदस्त विजय, हैदराबादचा 6 विकेट्सने धुव्वा
Virat Kohli and Devdutt Padikkal RCB IPLImage Credit source: @IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 28, 2026 | 11:40 PM
Share

इम्पॅक्ट प्लेअर देवदत्त पडीक्कल आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या जोडीने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 19 व्या मोसमात विजयी सलामी दिली आहे. आरसीबीने सनरायजर्स हैदराबादवर 6 विकेट्सने अप्रतिम असा विजय साकारला. कॅप्टन इशान किशन याच्या 80 धावांच्या जोरावर हैदराबादने आरसीबीसमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 26 बॉलआधी 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. आरसीबीने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 203 रन्स केल्या. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने ही कामगिरी केली. तर इशान किशन कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात हैदराबादला विजयी करण्यात अपयशी ठरला.

आरसीबी पहिलीच टीम

एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 2008 नंतर पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आरसीबीने या विजयासह खास कामगिरी करुन दाखवली. आरसीबीने मोसमातील पहिल्याच दिवशी 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारी पहिलीच टीम ठरली.

सामन्यात काय झालं?

आरसीबीने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादसाठी कॅप्टन इशान किशन,हेन्रिक क्लासेन आणि अनिकेत वर्मा या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. इशानने 80, क्लासेनने 31 तर अनिकेतने 43 धावांचं योगदान दिलं. हैदराबादने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 201 धावा केल्या. जेकब डफी आणि रोमरियो शेफर्ड या दोघांनी आरसीबीसाठी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या.

आरसीबीची विजयी सलामी

त्यानंतर विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार आणि टीम डेव्हिड या चौघांनी आरसीबीच्या विजयात बॅटिंगने योगदान दिलं. मात्र विराट आणि देवदत्त हे दोघे आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. फिल सॉल्ट 8 धावांवर बाद झाले. त्यानंतर विराट आण देवदत्त या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 101 धावांची शतकी भागीदारी केली. देवदत्तने 61 रन्स केल्या. त्यानंतर रजत पाटीदार आणि विराट कोहली या दोघांनी 22 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली.

रजतने 12 बॉलमध्ये 31 रन्स केल्या. रजतने या खेळीत 3 सिक्स आणि 2 फोर लगावले. रजतनंतर जितेश शर्मा आला तसाच परत गेला. त्यानंतर टीम डेव्हिड आणि विराट या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 19 बॉलमध्ये नॉट आऊट 40 रन्सची पार्टनरशीप केली आणि आरसीबीला विजयी केलं. विराटने नाबाद 69 रन्स केल्या. तर टीमने 16 रन्सची खेळी केली. हैदराबादसाठी डेव्हिड पेन याने दोघांना आऊट केलं. तर जयदेव उनाडकट आणि हर्ष दुबे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

Follow Us
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!