AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Merger : अजूनही वेळ गेलेली नाही, बड्या नेत्याचे दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणावर मोठे वक्तव्य, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही गट एकत्र येणार?

NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीतील काही नेत्यांना चेकमेट मिळत आहेत. त्यात मंत्र्यांची एकामागून एकाची विकेट पडत आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार का याविषयीची चर्चा होत आहे. दोन्ही गट एकत्र येणार का?

NCP Merger : अजूनही वेळ गेलेली नाही, बड्या नेत्याचे दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणावर मोठे वक्तव्य, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही गट एकत्र येणार?
राष्ट्रवादी विलीनीकरण, अजित पवार, शरद पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 29, 2026 | 11:04 AM
Share

NCP Merger:  दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा लक्ष वेधले आहे. अजितदादांच्या विमान अपघातानंतर लागलीच या चर्चा सुरू झाल्या. पण दोन्ही पक्षांच्या एकत्रि‍करणाची नुसतीच चर्चा झाली. खलबतं झाली नाही. दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे करण्यात आले. पुढे विलीनीकरणावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये शा‍ब्दिक वॉर पाहायला मिळाले. बडे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर तोंडसुख घेण्यात आले. तर आता दोन गोटातील नेते एकमेकांना चेकमेट करच असल्याचे समोर येत आहे. या खेळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची एकामागून एक विकेट पडताना दिसत आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची सुतराम शक्यता नसल्याचे म्हटले जात होते. पण आमदार सुनील शेळके यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी या निखाऱ्यावरील राख उडवली आहे. पुन्हा एकत्रि‍करणाच्या चर्चांना हवा मिळाली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची अट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, आनंद आहे, असे मोठे वक्तव्य आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. अजूनही एकत्रि‍करणाची वेळ गेली नसल्याचा दावा शेळकेंनी केला आहे. कामकाज करत असताना दादांची उणीव भासत आहे. दादांचंअपघाती निधन झालं. त्यांनतर शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी चर्चा झाली सांगितलं. दादांसोबत भेट झाली सांगितलं. दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. दादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळायला हवा. ती भूमिका वरिष्ठ नेत्यांनी पार पाडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, तर आनंद आहे, असे वक्तव्य शेळके यांनी केले. दोन्ही पक्ष एकत्र आले तर राष्ट्रवादी काँग्रेस मोठा होईल. व्यक्तिगत स्वार्थ असलेला विरोध करेल, असेही शेळके म्हणाले. सुनेत्रा पवार यांचा नेतृत्व मान्य असेल तर एकसंघ होतील. नेतृत्व मान्य नसेल तर दुसर्‍या पक्षाचा पर्याय शोधला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित दादांच्या अपघातच सत्य सर्वांसमोर आणतील, असा विश्वासही शेळके यांनी व्यक्त केला.

बड्या नेत्यांचं मत काय?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते. फक्त चर्चेची तयारी हवी असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचं मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवारांशी चर्चा केली जाऊ शकते. पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज आहे. लोकशाहीत चर्चेला महत्त्व असतं. फक्त ती चर्चा एकांगी नसावी. सुनेत्रा पवारांशी चर्चा करावी. त्या निर्णय घेतील, असे या नेत्याने स्पष्ट केले.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात