AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुछ तो बड़ा होने वाला है, ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी? या बड्या नेत्याची मोठी भविष्यवाणी, राज्यात महाभूकंप?

Operation Tiger, Operation Tutari: राज्यात कुछ तो बड़ा होने वाला है, असा दावा करत या नेत्यानं एकच खळबळ उडवून दिली आहे. ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी हे लवकरच राज्याला कळेल असा दावाही या बड्या नेत्यानं केला आहे. त्यामुळे कोणत्या गटाला सुरूंग लागणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.

कुछ तो बड़ा होने वाला है, ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी? या बड्या नेत्याची मोठी भविष्यवाणी, राज्यात महाभूकंप?
ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी? Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 29, 2026 | 9:38 AM
Share

Operation Tiger, Operation Tutari: राज्याच्या राजकारणात पुन्हा महाभूंकपाची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राजकीय सारापाटावरील सत्ता समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उद्धव सेना अथवा राष्ट्रवादी शरद पवार गटाला दे धक्का मिळण्याची चर्चा रंगली. राज्यसभा निवडणूक पार पडल्यानंतर राजकीय भूकंपाची चर्चा मागे पडली होती. पण पडद्याआड बड्या घाडमोडी घडत असल्याचे शिंदे गटातील नेत्याच्या वक्तव्याने समोर आले आहे. काय आहे मोठी राजकीय अपडेट?

2022 मध्ये शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी पक्षाला मोठा सुरूंग लागला. शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आणि काही खासदारांसह भाजप जवळ केली. तर अगदी थोड्याच महिन्यात अजितदादांनी राष्ट्रवादीचा मोठ्या गटासह भाजप सरकारमध्ये प्रवेश केला. या दोन्ही घटनांनी राज्यातील राजकारण ढवळून निघालं. भाजपच्या ऑपरेशन लोट्सची तर सर्वच पक्षांना कायम धास्ती आहे. काँग्रेसचे अनेक नेते ऑपरेशन लोट्समुळे भाजपच्या गळाला लागले. आता राज्यात पुन्हा काही खासदार आणि आमदार शिंदे सेना अथवा भाजपमध्ये जाणार का, याची चर्चा रंगली आहे.

कुछ तो बड़ा होने वाला है

“मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की, कुछ तो बडा होने वाला है. राजकारणात काहीतरी होणार आहे. राज्यातील राजकारणात मोठा भूंकप होणार आहे. मग ते ऑपरेशन टायगर होईल की ऑपरेशन तुतारी होईल की इतर काही होईल हे योग्य वेळ आल्यानंतर समजेल. राजकारणात परफेक्ट टाईमला खूप महत्त्व असतं. तेव्हा योग्य वेळ आल्यानंतर नक्की सांगू.” असा राजकीय बॉम्ब एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी टाकला. नांदेडमध्ये संध्याताई प्रतिष्ठान तर्फे आयोजित महिलांच्या सत्कार कार्यक्रमासाठी ज्योती वाघमारे काल नांदेडमध्ये होत्या. त्यांनी यावेळी हे राजकीय खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले.

तर या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती. त्यात शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवल्याने प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केल्याचे वृत्त समोर आले होते. तर उद्धव ठाकरे यांनी खासदारांवर विश्वास दाखवला होता. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच ही बैठक झाल्याने तिला महत्त्व आले. शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेकडून अद्याप याविषयीवर प्रतिक्रिया आलेली नाही.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर