AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dawood Ibrahim House Demolition: दाऊदचं घर पाडायचं तर पाडा पण… हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखानाबाबत स्थानिक नागरिकांची विनंती

Dawood Ibrahim House Demolition: मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया लेनमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलोपार्जित घर आणि संबंधित इमारतीवर अखेर महापालिकेचा बुलडोझर चालणार आहे. त्यापूर्वी नागरिकांनी विनंत केली आहे.

Dawood Ibrahim House Demolition: दाऊदचं घर पाडायचं तर पाडा पण... हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखानाबाबत स्थानिक नागरिकांची विनंती
Dawood IbrahimImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 9:29 AM
Share

मुंबईतील भेंडी बाजार परिसरात असलेली हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही धोकादायक इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर आणि ऑफिस आहे. या घरात बसूनच दाऊदने अनेक षडयंत्र रचली होती. आज याच घरावर मुंबई महापालिकेकडून तोडक कारवाई केली जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडणार आहे. मात्र, या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या प्रार्थना हॉल आणि मशिदीचा मुद्दा आता चर्चेत आला आहे.

एक स्थानिक नागरिक टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाला की, जी इमारत खाली आहे ती गेल्या काही महिन्यांपासून खाली आहे. वर जे लोक राहात होते ते भाडेत्त्वावर राहात होते. ते आता खाली आहे. या इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरला मस्जिद आहे. ही मस्जिद 100 वर्षे पूर्वीची मस्जिद आहे. ती मस्जिद सी वन कॅटेगिरीची आहे आणि आपण नोटीस दिलेली आहे. पण कुठे पण सी वनचे डिमॉलीश करतात कुठे पण तेव्हा वरचे मजले पाडतात. ग्राऊंड फ्लोअर असाच ठेवतात. ती मस्जिद आहे आणि आमचा जो विरोध आहे तो तुम्ही बिलडोजर, मशीन लावणार त्यामुळे मस्जिदला धोका आहे. इमारतीचा वरचा भाग हा असा दिसत आहे. पण मस्जिद आतून पूर्णपणे चांगली आहे. ती सी वन कॅटेगिरीची नाहीये.

पुढे तो म्हणाला की, वरचा भाग पाडण्याला आमचा विरोध नाही. तिकडे कोणी राहात पण नाही. कोणाला धोका पण नाही. फक्त ग्राऊंड फ्लोअरला मस्जिद आहे तिथे लोक येतात. प्रार्थना करुन ते लोक आपापल्या घरी जातात. पण तुम्हाला हे करायचे आहे तर तुम्ही मॅन्युअली करा. मॅन्युअली करायला कोणाचा विरोध असणार आहे? तुम्ही बुलडोझर लावणार, मशीनरी लावणार त्यामुळे मस्जिदला धोका आहे.

या संदर्भात महत्त्वाची बैठक

मुसाफिरखाना परिसरातील मशिदीबाबत मुंबई महापालिकेकडून कारवाईच्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर कारवाईसंदर्भात निर्णय होणार आहे. आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. कारवाईच्या चर्चेमुळे परिसरात तणाव आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बैठकीला विशेष महत्त्व आहे. मशिदीवरील कारवाईबाबत महापालिका प्रशासन, आयुक्त अश्विनी भिडे काय भूमिका घेणार? आणि बैठकीनंतर नेमका काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय

मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया लेनमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलोपार्जित घर आणि संबंधित इमारतीवर अखेर महापालिकेचा बुलडोझर चालणार आहे. हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही जीर्ण आणि धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्याची तयारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. यासंदर्भात अधिकृत नोटीस जारी करण्यात आली असून, आज तोडकामाची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे.

Follow Us
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून...
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून मोठी कारवाई!
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटने...
Rajabhau Bhinge : शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटनेमागचं नेमकं कारण समोर?
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे वातावरण तापलं!
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी