AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6300mAh बॅटरीसह रेडमीचा तगडा फोन लाँच, कमी किमतीत मिळणार प्रीमियम फीचर्स

भारतात Redmi 15A लॉंच झाला असून, यात पॉवरफुल 6300mAh बॅटरी आणि 5G ऑक्टा-कोर चिपसेट आहे. चला या हँडसेटची किंमत, विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल आणि यात कोणती वैशिष्ट्ये असतील याबद्दल जाणून घेऊयात.

6300mAh बॅटरीसह रेडमीचा तगडा फोन लाँच, कमी किमतीत मिळणार प्रीमियम फीचर्स
RedmiImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 10:54 PM
Share

Redmi 15A भारतीय बाजारपेठेत लाँच झाला आहे. शाओमीच्या सब-ब्रँडच्या परवडणाऱ्या स्मार्टफोन पोर्टफोलिओमध्ये हा नवीनतम स्मार्टफोन आहे. हा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असून, हा फोन ऑक्टा-कोर 5G चिपसेटवर चालतो. याच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पॉवरफूल 6300mAh बॅटरी आणि ड्युअल रियर कॅमेरा युनिटचा समावेश आहे. चला जाणून घेऊया की या हँडसेटची किंमत किती आहे.

भारतात Redmi 15A ची किंमत

भारतात Redmi 15A या हँडसेटची किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 12 हजार 999 रूपये आहे. तसेच 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 16 हजार 499 रूपये आणि 4GB रॅम व 128GB स्टोरेज असलेल्या टॉप-एंड व्हेरिएंटसाठी 14 हजार 499 रूपये आहे. हा फोन एस ब्लॅक, ऑसम ब्लू आणि अमेझ पर्पल या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

हा फोन 3 एप्रिलपासून फ्लिपकार्ट, Mi.com आणि अधिकृत शाओमी रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा फोन Realme P4 Lite 5G, Motorola g67 power 5G, Poco M7 Plus 5G आणि Samsung Galaxy F36 5G यांच्याशी स्पर्धा करतो.

Redmi 15A उत्तम फीचर्स

  • ऑपरेटिंग सिस्टम: हा ड्युअल-सिम फोन अँड्रॉइड 16 वर आधारित HyperOS 3.0 वर चालतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार या फोनला चार वर्षांसाठी अँड्रॉइड अपडेट्स आणि सहा वर्षांसाठी सुरक्षा पॅचेस मिळतील.
  • खास वैशिष्ट्ये: या फोनमध्ये महागड्या फोन्समध्ये मिळणारे Circle to Search, Google Gemini आणि Xiaomi Interconnectivity यांसारखी एआय-आधारित वैशिष्ट्ये देखील आहेत, म्हणजेच तुम्हाला एका स्वस्त फोनमध्येही प्रीमियम वैशिष्ट्यांचा आनंद घेता येईल.
  • स्क्रीन: या डिव्हाइसमध्ये 6.9-इंचाचा HD+ डिस्प्ले असून, तो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 240Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट आणि 800 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
  • चिपसेट: हा फोन 6nm प्रक्रियेवर तयार केलेल्या T8300 5G SoC वर चालतो, सोबत उत्तम ग्राफिक्ससाठी Mali-G57 GPU, 6GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज आहे.
  • स्टोरेज: मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 2 टीबी पर्यंत वाढवता येते.
  • कॅमेरा सेटअप: या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून, त्यात 32-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. समोरच्या बाजूला सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे.
  • बॅटरी: या फोनमध्ये शक्तिशाली 6300mAh बॅटरी आहे, जी 15W वायर्ड चार्जिंग आणि 7.5W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की एकदा चार्ज केल्यावर दोन दिवसांपर्यंतचा प्लेटाइम मिळतो.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.