AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tilak Varma: तिलक वर्मामुळे टेन्शन वाढलं! टीम इंडियाच्या या निर्णयामुळे सर्व काही अंगाशी आलं

आयर्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. पण पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजी फिकी पडली. ओपनिंग जोडी फेल गेली, तर मधल्या फळीत उपकर्णधार तिलक वर्माच्या फलंदाजीने टेन्शन वाढवलं.

Tilak Varma: तिलक वर्मामुळे टेन्शन वाढलं! टीम इंडियाच्या या निर्णयामुळे सर्व काही अंगाशी आलं
Tilak Varma: तिलक वर्मामुळे टेन्शन वाढलं! टीम इंडियाच्या या निर्णयामुळे सर्व काही अंगाशी आलंImage Credit source: PTI
| Updated on: Jul 02, 2026 | 8:09 PM
Share

टीम इंडियाला आयर्लंडसारखा दुबळा संघही टी20 क्रिकेटमध्ये भारी पडला. दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 ने मात दिली. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला. पण भारताची फलंदाजीची बाजू मात्र यामुळे उघडी पडली. त्यात वैभव सूर्यवंशीला डावलल्याने क्रीडाप्रेमींचा संताप झाला तो वेगळा.. वैभव सूर्यवंशीमुळे कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर दबाव वाढला आहे. त्याच्यासाठी कोणाला बेंचवर बसवायचं हा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यासाठी संजू सॅमसनला बसवलं जाण्याची शक्यता वाढली आहे. कारण त्याची बॅट काही चालली नाही. दुसरीकडे, तिलक वर्माचा फलंदाजीही चिंतेचा विषय ठरली आहे.

आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये संथ फलंदाजी

भारतीय संघासाठी आयर्लंड दौरा एक वाईट स्वप्नासारखं आहे. तिलक वर्माचं या मालिकेतील कामगिरी संमिश्र राहिली. त्याला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध टी20 सामने खेळण्याची संधी मिळाली. या तीन पैकी एका सामन्यात अर्धशतक ठोकलं. पण दोन सामन्यात 20पेक्षा कमी धावा राहिल्या. त्यात ज्या काही धावा केल्या त्या देखील संथ गतीने केल्या. आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात 21 चेंडूत 19 धावा, दुसऱ्या टी20 सामन्यात 46 चेंडूत 55 धावा केल्या. तर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 13 चेंडूत 13 धावाच करू शकला.

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील दोन सामन्यात तीन विकेट झटपट बाद झाल्यानंतर पावरप्लेमध्येच तिलक वर्माला फलंदाजीसाठी यावं लागलं. तेव्हा संघाची स्थिती नाजूक होती. पण इंग्लंडविरुद्ध तसं काही नव्हतं. तिलक वर्मा 9 व्या षटकात फलंदाजीला आला. तेव्हा भारतीय संघाने 10.50 च्या रनरेटने 88 धावा केल्या होत्या. असं असूनही तिलक वर्मा 100 च्या स्ट्राईक रेटने धावा करून बाद झाला. पण आता त्याच्या फलंदाजीवर बोट ठेवलं जात आहे. मागची काही आकडेवारी पाहिली तर वेगाने धावा करताना तिलक वर्माला झुंजावं लागत असल्याचं दिसलं. 2022 मध्ये 20 डावात 133.2 च्या स्ट्राईक रेटने 694 धावा, 2023 मध्ये 32 डावात 149.6 च्या स्ट्राईक रेटने 941 धावा, 2024 मध्ये 28 डावात 159.5 च्या स्ट्राईक रेटने 1166 धावा, 2025 मध्ये 31 डावात 132.45 च्या स्ट्राईक रेटने 910 धावा आणि 2026 मध्ये 26 डावात 141.95 च्या स्ट्राईक रेटने 653 धावा केल्या.

तिलक वर्माची कामगिरी ठरतंय डोकेदुखी

तिलक वर्मा पाचव्या स्थानावर फलंदाजी करतो. त्यामुळे या स्थानावर जबाबदारीसह वेगाने धावा करणं आवश्यक असतं. त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ही जबाबदारी पार पाडली. पण ही जबाबदारी त्याने अनुकूल स्थितीत पार पाडली. खेळपट्टी गोलंदाजीला पूरक किंवा फिरकी गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसला. टिम इंडियासाठी ही चांगली बाब नाही. कारण तिलक वर्माच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्याला बसवणं कठीण आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात