AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का? अखेर सस्पेन्स संपला, महायुतीच्या गोटातून मोठी बातमी

राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे, मात्र अखेर आता सस्पेन्स संपला आहे. महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का? अखेर सस्पेन्स संपला, महायुतीच्या गोटातून मोठी बातमी
eknath shindeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 02, 2026 | 8:05 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटात फुट पडण्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडे 7 खासदार होते, परंतु शिवसेना ठाकरे गटात फुट पडल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचली. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. दरम्यान त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी या चर्चेला पूर्वविराम दिला आहे.  देवेंद्र फडणवीस एका वृत्त वाहिनीच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?  

ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागा लागतात. ज्या पक्षाकडे स्वताचे निवडून आलेले १३७ आमदार आहे, त्या राज्याचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा राहील की इतर पक्षाचा राहील? त्याच पक्षाचा राहणार आहे. त्यामुळे या कहाण्या स्टोऱ्या किती तयार झाल्या तरी रिअॅलिटी मला माहीत आहे. वास्तव शिंदे साहेबांना माहीत आहे. त्यामुळे अशा बातम्यांनी मी विचलित होत नाही. शिंदेही विचलित होत नाही. प्रत्येकाला वाटतं आपली स्वप्न पूर्ण व्हावीत त्यात वाईट काय आहे, अशी प्रतिक्रिया यावर फडणवीस यांनी दिली आहे, त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान निधी मिळत नाही, म्हणून आम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश केला  असं कारण शिवसेना ठाकरे गटातील बंडखोर आमदारांनी पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सांगितलं आहे. यावर देखील यावेळी फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  मला वाटतं अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकतं. निधीपुरतं मर्यादित नाही, प्रोजेक्ट असतात, सोशल विषय असतात. सत्ता पक्षात किंवा विरोधात असतो तेव्हा थोडा परिणाम होतो. किंवा नेतृत्व आत्मविश्वास वाढवण्यात कमी पडतो तेव्हा असं होतं. राजकारणात लोक भविष्य पाहतात. ज्यांच्या नेतृत्वात मी काम करतोय ते माझं भविष्य सुरक्षित करू शकत नाही असं वाटतं, तेव्हाही पक्षप्रवेश होतात, असं यावेळी फडणीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर