AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी अक्षय कुमार बोलतोय… सायबर गुन्हेगारांकडून 26 लाखांची फसवणूक…. अशी चूक कधीच करु नका

सायबर फसवणुकीची आणखी एक केस समोर आहे... ज्यामुळे खळबळ उडाली आहे. तब्बल 26 लाख रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी बनावट ओळख वापरून आपण सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) अधिकारी असल्याचा दावा केला.

मी अक्षय कुमार बोलतोय... सायबर गुन्हेगारांकडून  26 लाखांची फसवणूक....  अशी चूक कधीच करु नका
| Updated on: Mar 27, 2026 | 1:30 PM
Share

सायबर गुन्ह्याचे प्रकरण दिवसागणिक वाढत आहेत. आता समोर आलेल्या प्रकरणामुळे तर सर्वत्र खळबळ माजली आहे. सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करण्यासाठी चक्क BFS नावाचा वापर केला आहे. ही धक्कादायक घटना कर्नाटक येथील राजधानी बेंगळुरू येथे घडली आहे… बंगळूरुस्थित एक कंपनी संरक्षण संघटनांना हार्ड प्लास्टिक केसेसचा पुरवठा करते. 9 मार्च रोजी, कंपनीला एका व्यक्तीचा फोन आला, ज्याने मालाविषयी चौकशी करत ही ऑर्डर सीमा सुरक्षा दलासाठी (बीएसएफ) असल्याचा खोटा दावा करण्यात आला.

सायबर फसवणूक करणाऱ्याने समोरच्या व्यक्तीची फसवणूक करण्यासाठी बनावट ओळख वापरली. त्याने स्वतःची ओळख बीएसएफच्या खरेदी विभागातील अक्षय कुमार म्हणून सांगितली. 11 मार्च रोजी, सायबर फसवणूक करणाऱ्यांना एक पर्चेस ऑर्डर मिळाली आणि कंपनीने एकूण देय रकमेच्या 50% आगाऊ रक्कम म्हणून मागितली आणि एक इनव्हॉयस देखील जारी करण्यात आला.

पीडित कंपनीला दुसऱ्या कंपनीचा कॉल आला… कंपनीतील एका व्यक्तीने स्वतःची कुलदीप सिंग म्हणून खोटी ओळख सांगितली. आरोपीने पीडित कंपनी सर्वात आधी विश्वासात घेतलं… पैशांचा संपूर्ण व्यवहार भारतीय सेनेच्या प्रक्रियेनुसार पूर्ण करण्यात येईल… असं देखील सांगण्यात. कंपनीचा विश्वास संपादन करण्यासाठी आधी 10 त्यानंतर 20 रुपयांचा व्यवहार करण्यात आला.

21 मार्च रोजी, कंपनीला RTGS, NEFT आणि IMPS मार्फत अनेक बँक खात्यांमध्ये मोठी रक्कम हस्तांतरित करण्यास राजी करण्यात आले. एका प्रकरणात, 4.48 लाख तात्पुरते परतही करण्यात आले, ज्यामुळे विश्वास आणखी दृढ झाला. कंपनीने तब्बल 26 लाख 22 हजार 391 रुपयांचा व्यवहार केला. त्यानंतर बनावट कंपनीसोबत संपर्क होऊच शकले नाहीत. त्यानंतर पीडित कंपनी सायबर फसवणूक झाल्याचं लक्षात आलं… कंपनीने सायबर क्राईम हेल्पलाईनवर तक्रार दाखल केली असून पूर्व विभागीय सायबर पोलिसांकडे गुन्हा नोंदवला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी आणि पैसे परत मिळवण्यासाठी तपास सुरू आहे.

सायबर फसवणुकीपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी अनोळखी नंबरची खात्री करुन घ्या… कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका… पैसे परत मिळत असा विश्वास असेल तरी, कोणाकडूनही पैसे मागू नका आणि कोणाला पैसे देऊ नका… शिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा OTP देऊ नका…

Follow Us
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर.
आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित....
आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित.....
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?.
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....