AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | Petrol Diesel Crisis | आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित; तुमचं शहर यात आहे का?

tv9 Marathi Special Report | Petrol Diesel Crisis | आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित; तुमचं शहर यात आहे का?

| Updated on: Mar 27, 2026 | 11:05 AM
Share

गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत रॉकेल वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना आता पूर्वीप्रमाणे रेशन कार्डवर रॉकेल उपलब्ध होणार आहे. सरकारच्या माहितीनुसार, प्रत्येक कुटुंबाला शिधापत्रिकेवर 3 लिटर रॉकेल देण्यात येणार आहे.

गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत रॉकेल वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना आता पूर्वीप्रमाणे रेशन कार्डवर रॉकेल उपलब्ध होणार आहे. सरकारच्या माहितीनुसार, प्रत्येक कुटुंबाला शिधापत्रिकेवर 3 लिटर रॉकेल देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्राला एकूण 37 लाख 44 हजार लिटर रॉकेलचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार, मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर ही प्रमुख शहरे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये रॉकेलचे वितरण केले जाणार आहे. तसेच रॉकेलच्या उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिका धारकांसोबतच शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांनाही रॉकेल दिले जाणार आहे. शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांसाठी ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे अनेक नागरिकांना घरातील जुने स्टोव्ह पुन्हा वापरात आणावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Mar 27, 2026 11:05 AM
Follow Us