Supriya Sule | सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या भूमिकेवरही सवाल
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचं स्वागत केलं. सुळे म्हणाल्या की, खरात प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी फडणवीस यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचं स्वागत केलं. सुळे म्हणाल्या की, खरात प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी फडणवीस यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. तसेच, एके काळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेविरुद्ध आपलं आयुष्य अर्पण केलं, आणि आज त्याचा वारसा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुढे नेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं की, सुळे यांचे वक्तव्य चीड आणि संताप व्यक्त करणारं आहे. दाभोलकरांच्या खुनाच्या आरोपांतून काही आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांना निर्दोष मानण्यात आले होते, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी कोणता मार्ग निवडला, याबाबत सुळे यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे सपकाळ यांनी म्हटले.
Published on: Mar 27, 2026 12:56 PM
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...

