Chandrakant Khaire | अशोक खरात प्रकरण गाजतंय: चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अनेक महिलांचे शोषण झाल्याचे आरोप करण्यात आले असून, काही राजकीय नेत्यांशी त्याचे संबंध असल्याचीही चर्चा आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी खरातसोबत फोटो असलेल्या नेते आणि मंत्र्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अनेक महिलांचे शोषण झाल्याचे आरोप करण्यात आले असून, काही राजकीय नेत्यांशी त्याचे संबंध असल्याचीही चर्चा आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी खरातसोबत फोटो असलेल्या नेते आणि मंत्र्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. दरम्यान, ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे यांनी अघोरी पूजेबाबत एक धक्कादायक दावा केला आहे. “माझ्यावरही अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, मी देवभक्त असल्यामुळे मला काही झाले नाही, उलट तो व्यक्तीच मरण पावला,” असे त्यांनी सांगितले. तसेच, खैरे यांनी जादूटोणा आणि अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये, असा सल्ला दिला. “राजकीय लोकांनी अशा बाबांकडे जाऊ नये, देवाच्या दारी जाऊन प्रार्थना करावी,” असेही त्यांनी नमूद केले. या सर्व घडामोडींमुळे खरात प्रकरण अधिकच चर्चेत आले असून, पुढील तपासात आणखी काय उघड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Mar 26, 2026 05:23 PM
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्

