AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कामदा एकादशीला या वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ, घरात वाढेल धन व समृद्धी

कामदा एकादशीला उपवास आणि पूजेसोबतच दानही केले जाते. असा विश्वास आहे की जर कोणी खऱ्या मनाने उपवास केला किंवा दान केले, तर त्यांच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतात. घरात धन आणि समृद्धी वाढते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या वस्तूंचे दान करावे.

कामदा एकादशीला या वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ, घरात वाढेल धन व समृद्धी
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 12:47 PM
Share

सनातन धर्मात एकादशी तिथीला मोठे महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला उपवास केला जातो. त्याच प्रमाणे प्रत्येक एकादशी तिथीचे स्वतःचे महत्त्व आहे. त्यामुळे हा उपवास विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. तर कामदा एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. उपवासासोबतच या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजाही केली जाते.

धार्मिक मान्यतेनुसार कामदा एकादशीला उपवास आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने जाणूनबुजून किंवा नकळत केलेली सर्व पापे धुतली जातात. देवाचा आशीर्वादही मिळतो. उपवास आणि पूजेसोबतच कामदा एकादशीला दानही केले जाते. असा विश्वास आहे की जर कोणी खऱ्या मनाने उपवास केला किंवा दान केले, तर त्याच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतात आणि घरात धन व समृद्धी वाढते. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणत्या वस्तूंचे दान करणे महत्वाचे आहे ते जाणून घेऊयात.

कामदा एकादशी 2026 केव्हा आहे?

पंचांगानुसार, एकादशी तिथी 28 मार्च म्हणजेच उद्या शनिवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी सुरू होईल.

एकादशी तिथीचा शेवट रविवार 29 मार्च रोजी सकाळी 07 वाजून 46 मिनिटांनी होईल.

उदय तिथीनुसार कामदा एकादशीचा उपवास 29 मार्च रोजी पाळला जाईल. हा उपवास सोमवार 30 मार्च रोजी सकाळी 6 वाजून 14 मिनिटांनी ते 7 वाजून 09 मिनिटांच्या दरम्यान सोडला जाईल.

कामदा एकादशीला या गोष्टींचे दान करा

कामदा एकादशीच्या दिवशी मातीच्या भांड्यात किंवा घागरीत पाणी भरून दान करणे उत्तम असते.

या दिवशी गहू, तांदूळ किंवा कलिंगड आणि आंबा यांसारखी मोसमी फळे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

या दिवशी गरजूंना छत्री किंवा चप्पल देणे हे एक अत्यंत पुण्यकर्म मानले जाते.

या दिवशी संध्याकाळी मंदिरात किंवा तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने जीवनातील अंधकार दूर होतो.

या दिवशी धार्मिक पुस्तकांचे दान करणे देखील खूप फलदायी ठरते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...