AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय

मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय

| Updated on: Jun 29, 2026 | 12:36 PM
Share

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील दोषी आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील दोषी आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 1 मे 2026 रोजी घडलेल्या या अमानुष घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. आरोपी भीमराव कांबळे याने चिमुकलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने सोबत नेले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला होता.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. त्यामध्ये आरोपी चिमुकलीला हात धरून घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत होता. या महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी भीमराव कांबळे याला अटक केली. तपासादरम्यान आरोपीनेही आपला गुन्हा कबूल केला होता. तसेच, आरोपीच्या कुटुंबीयांनीही त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका घेतली होती. यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने भीमराव कांबळे याला दोषी ठरवले होते. मात्र, शिक्षेबाबतचा निर्णय 29 जूनपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. अखेर आज विशेष न्यायालयाने आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

निकाल देताना न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचे नमूद केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन हा निर्णय देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चिमुकलीचे आई-वडील न्यायालयात उपस्थित होते. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी सुरुवातीपासूनच केली होती. अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर या गाजलेल्या प्रकरणाला महत्त्वपूर्ण न्यायालयीन पूर्णविराम मिळाला आहे.

Published on: Jun 29, 2026 12:36 PM

Follow Us