Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग परिसरात धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ महिलांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान काही महिला इमारतीच्या भिंतीवर चढून बसल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग परिसरात धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ महिलांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान काही महिला इमारतीच्या भिंतीवर चढून बसल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलनकर्त्या महिलांनी कृषी विभागातील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, यासाठी महिलांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू ठेवले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढण्याचे आणि त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जोपर्यंत त्यांच्या मागण्यांबाबत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका महिलांनी घेतली आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे सेंट्रल बिल्डिंग परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरू आहे.
Published on: Jun 29, 2026 04:13 PM
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का

