वरुण धवनची दीड वर्षांची लेक गंभीर आजाराच्या विळख्यात, म्हणाला, ‘तिला व्यवस्थित चालता किंवा धावता येत नाही…’
Varun Dhawan Daughter : अभिनेता वरुण धवन याच्या लेकीला नेमका कोणता आजार? गंभीर आजाराचं नाव सांगत अभिनेता म्हणाला, 'तिला व्यवस्थित चालता किंवा धावता येत नाही...', सध्या सर्वत्र वरुण याच्या लेकीच्या आरोग्याची चर्चा....

अभिनेता वरुण धवन याने लॉन्गटाईम गर्लफ्रेंड नताशा दलाल हिच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर दोघांनी एका गोंडस मुलीचं जगात स्वागत केलं. इतर सेलिब्रिटींप्रमाणे वरुण आणि नताशा यांनी देखील मुलीसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवली आहे. त्यांच्या मुलीचं नाव लारा असं आहे… नुकताच झालेल्या एका मुलाखतीत वरुण याने लेकीच्या गंभीर आजाराबद्दल सांगितलं आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या लेकीला व्यवस्थित चालता किंवा धावता येत नाही. लारा हिला ‘डेवलपमेंटल डिस्प्लेजिया ऑफ द हिप’ (DDH) या गंभीर आजाराने ग्रासल आहे. यामुळे व्यक्ती व्यवस्थित चालू किंवा धावू शकत नाही. लारा दीड वर्षांची असताना तिच्या या गंभीर आजाराचं निदान झालं…
आजाराचं निदान झाल्यानंतर तिच्यावर उपचार सुरु झाले आणि आता ती बरी होत आहे. लेकीबद्दल वरुण म्हणाला, ‘माझ्या लेकीला डीडीएच झालं होतं… आजारात कंबरेचा सांधा (Hip Joint) सॉकेटमधून बाहेर सरकतो, ज्यामुळे मुलांचा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान वाटू लागतो, ज्यामुळे त्यांची चाल वाकडी होते… माझी दीड वर्षांची लेक जवळपास अडीच महिने प्लास्टरमध्ये होती…’, असं अभिनेता म्हणाला. लेकीच्या कठीण काळाबद्दल सांगताना वरुण याच्या डोळ्यात पाणी आलं.
पुढे वरुण म्हणाला, ‘लारा हिला शस्त्रक्रियेची गरज भासली नाही… एका उपचारानंतर कंबरेचा सांझ पुन्ही जागेवर बसवण्यास मदत होते. त्यासाठी एक विशेष वैद्यकीय प्रक्रिया करावी लागते… . त्यानंतर तिला तब्बल अडीच महिने ‘स्पायका कास्ट’ (Spica Cast) म्हणजेच कंबरेपासून पायापर्यंतच्या कडक प्लास्टरमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिला एनेस्थीसिया देण्यात आलं होतं. ती शुद्धीवर आल्यानंतर तिचं प्लास्टर पाहिल्यानंतर आम्हाला प्रचंड वेदना झाल्या… पण आता कास्ट निघालं आहे आणि यावर मी एक पुस्तक लिहिणार आहे.’ असं देखील अभिनेता वरुण धवन म्हणाला.
वरुन आणि नताशा यांचं नातं
वरुन आणि नताशा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेचला. 24 जानेवारी 2021 मध्ये वरुण आणि नताशा यांनी अलीबाग येथे मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले. तर 3 जून 2021 मध्ये वरुण आणि नताशा यांनी गोंडस लेक लारा हिचं जगात स्वागत केलं… मुलीच्या जन्मानंतर वरुण याने आतापर्यंत लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही.
