AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांचा पाय खोलात, चाकणकर यांना SIT कडून समन्स, चौकशी होणार, मोठी अपडेट काय?

Rupali Chakankar SIT Summoned: अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आता वाढली आहे. पहिल्यांदाच अशोक खरात व्यतिरिक्त इतर राजकीय व्यक्तीची चौकशी होणार आहे. रुपाली चाकणकर यांना एसआयटीने समन्स बजावल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांचा पाय खोलात, चाकणकर यांना SIT कडून समन्स, चौकशी होणार, मोठी अपडेट काय?
चाकणकर यांना SIT कडून समन्स
| Updated on: Mar 29, 2026 | 12:35 PM
Share

Rupali Chakankar SIT Summoned: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसते. त्यांना अगोदर महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर पाणी सोडावे लागले. आता त्यांना विशेष तपास पथकाने ( SIT) समन्स बजावल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अशोक खरात व्यतिरिक्त या प्रकरणात पहिल्यांदाच राजकीय व्यक्तीची चौकशी होणार आहे. चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना सहआरोपी करण्याची मागणी उद्धव ठाकरे सेनेच्या नेता सुषमा अंधारे आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती. याप्रकरणी सरकारवर मोठा दबाव आला होता. दोन्ही पदाचा राजीनामा दिल्यानंतर लागलीच रुपाली चाकणकर यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचे समोर येत आहे.

शिवानिका संस्थेच्या सदस्य रडारवर

दरम्यान शिवानिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती समोर येत आहे. रूपाली चाकणकर यांची देखील एसआयटी कडून आता चौकशी होण्याची शक्यता आहे. शिवानीका संस्थांचे सर्व व्यवहार आता SITच्या रडारवर आहे. दरम्यान समन्स म्हणजे आकाश पडलं असं नाही. तो चौकशीचा भाग असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

भोंदू खरात अगोदर पोलीस उपायुक्त कार्यालयात

विशेष कोर्टात घेऊन जाताना भोंदू अशोक खरातला पोलीस उपायुक्त कार्यालयात आणले. किरण कुमार चौहान यांच्या पोलीस उपायुक्त कार्यालय त्याला हजर करण्यात आले. या ठिकाणी काय युक्तिवाद करायचा यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची शक्यता आहे. गेल्या 10 मिनिटापासून भोंदू अशोक खरात पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आत होता. त्यानंतर त्याला नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. खरातचा मोबाईल फॉरेन्सिक अहवालही एसआयटीला प्राप्त झाला आहे. त्यातून या प्रकरणी अजून मोठा उलगडा होणार आहे.

खरात खरं सांगत नाही

अशोक खरात हा सत्य सांगत नसल्याचा युक्तीवाद पीडितेच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. याप्रकरणात अनेक कुटुंब उद्धवस्त झाल्याचे म्हणणे त्यांच्या वकिलांनी मांडले. आरोपी तपासात खरी उत्तरं देत नसल्याचे पीडितीच्या वकिलांनी म्हटले आहे. तर खरातच्या वकिलांनी त्याला पोलीस कोठडीची गरज नसल्याचे म्हणणे मांडले. अशोक खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 9 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे तर दोन गुन्हे हे फसवणुकीचे आहेत.

Follow Us
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात