AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Dnyate : तू मोठी अभिनेत्री होशील, तेव्हा मी या जगात नसेन…पतीचं भाकीत ठरलं खरं! मराठी अभिनेत्रीनं सांगितला भावुक प्रसंग

Asha Dnyate Emotional Incident : मराठी अभिनेत्री आशा ज्ञाते यांनी एका मुलाखतीत भावूक प्रसंग सांगितला आहे.

Asha Dnyate : तू मोठी अभिनेत्री होशील, तेव्हा मी या जगात नसेन...पतीचं भाकीत ठरलं खरं! मराठी अभिनेत्रीनं सांगितला भावुक प्रसंग
| Updated on: Nov 21, 2026 | 5:21 PM
Share

मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री आशा ज्ञाते यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील त्यांची ‘अम्मा’ ही भूमिका विशेष गाजली. अभिनेत्रीनं एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील भावुक प्रसंग सांगितलेला. २५ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीनंतर आशा यांना एका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मात्र, आयुष्यातील हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी त्यांचे पती त्यांच्यासोबत नव्हते. याच प्रसंगाची आठवण सांगताना आशा ज्ञाते भावुक झाल्या.

आशा ज्ञाते यांनी हिंदी मालिकाविश्वातही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील अभिनयासाठी त्यांना ITA Awards 2025 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक विनोदी अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे, अभिनय क्षेत्रात २५ वर्षे काम केल्यानंतर त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.

आशा ज्ञाते यांनी सांगितला प्रसंग

आशा ज्ञाते म्हणाल्या की, ‘सगळे मोठे हिंदी कलाकार त्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. मला वाटलं आपल्याला पुरस्कार नाही मिळणार. कारण, नीना गुप्तांपासून सर्वांना पुरस्कार होते. आपल्याला हे बघायला मिळतंय, हा आपल्यासाठी आनंद आहे, असा मी विचार केला. त्यांच्या खूपच कॅटेगरी होत्या, मला त्यातलं काही माहित नव्हतं. उशीर झालेला, त्यामुळे मी मुलीला म्हटलं, आपण जाऊया मला काही पुरस्कार मिळणार नाही. जिओ अवार्डने त्यावेळी पहिल्यांदाच सहाय्यक विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार ठेवलेला आणि तो पुरस्कार मला मिळाला. त्यांनी माझं नाव घेतलं, तेव्हा काही क्षणासाठी मी स्तब्ध झाले.’

‘त्यावेळी मला माझ्या नवऱ्याची आठवण आली. आम्ही टीव्हीवर पुरस्कार सोहळे बघायचो, तेव्हा मला माझे पती म्हणाले होते, ‘जेव्हा तू खूप मोठी अभिनेत्री होशील आणि मी या जगात नसेन, तर तुला पण जर असा एखादा पुरस्कार मिळाला तर तूसुद्धा म्हणशील ना, हा पुरस्कार मी माझ्या मिस्टरांना डेडीकेट करते, तू करशील ना मला डेडीकेट?’ मी त्यांना म्हटलं, तुम्ही मला साथ दिली म्हणून मी इथवर पोहोचले.’ ‘यंदा कर्तव्य आहे’ हा माझा पहिला सिनेमा प्रदर्शित होणार होता. तेव्हाही माझे पती म्हणाले होते, सिनेमा प्रदर्शित होईल, तेव्हा मी नसेन. सिनेमा ज्यावेळी प्रदर्शित झाला, तेव्हा माझ्या पतीचं निधन झालं. त्यामुळे, पुरस्कार सोहळ्याला मला संधी मिळाली आणि मी माझा पुरस्कार नवऱ्याला डेडीकेट केला.’ असं आशा यांनी शेवटी सांगितलं. ‘इट्स मज्जा‘ला दिलेल्या मुलाखतीत आशा ज्ञाते बोलत होत्या.

Follow Us
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात