AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातकडून नरबळी? पोलिस तपासात आढळले काय?

Nashik Bhondu Ashok kharat: नाशिकचा भोंदू अशोक खरात हा गेल्या 10 दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. भोंदूविरोधात पोलीस आता कोणता नवीन युक्तीवाद करतात. कोणता पुरावा सादर करतात याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान भोंदू अशोक खरातने नरबळी दिल्याच्या दिशेने तपास सुरू आहे.

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातकडून नरबळी? पोलिस तपासात आढळले काय?
नाशिक, भोंदू बाबा अशोक खरातImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 29, 2026 | 8:37 AM
Share

Nashik Bhondu Ashok kharat: नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात हा गेल्या 10 दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याच्यावरील गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याच्याविरोधात अनेक महिला सरसावल्या आहेत. त्याची गेल्या दहा दिवसात कसून चौकशी करण्यात आली. आज त्याची पोलीस कोठडी संपत आहे. पोलीस न्यायालयात कोणता युक्तीवाद करतात आणि त्याच्याविरोधात कोणता नवीन पुरावा सादर करतात याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे अशोक खरात याने मंत्र-तंत्र, अघोरी पूजा आणि जादूटोण्याची भीती दाखवून अनेकांना गंडा घातला. तर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. आता खरातने नरबळी दिल्याच्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे.

खरातला अजून दोन दिवसांची कोठडी?

अशोक खरातला यापूर्वी पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. ही कोठडी आज संपत आहे. त्याला आज नाशिक येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल. पोलीस त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. खरात विरोधात आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात महिलांच्या लैंगिक छळाचे अधिक गुन्हे आहेत. तर दोन गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहे. त्याने हवाला आणि सावकारीच्या माध्यमातून देश-परदेशात कोट्यवधींची हेराफेरी केल्याची बाब समोर येत आहे. आयकर खात्याने भोंदू खरातच्या मालमत्तेचा तपास सुरू केला आहे.

खरातने दिला नरबळी?

SIT चौकशीत पाच वापरलेले काडतूस सापडले होते. या काडतूसाच्या अनुषंगाने नरबळीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एसआयटीने नरबळीच्या अनुषंगाने तपास केला आहे. आज न्यायालयात याविषयीचा मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर खरातवर खुनाचा गुन्हा दाखल झाला तर हे प्रकरण गंभीर वळणावर जाणार आहे. आज न्यायालयात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तपास काय काय घेतले ताब्यात?

यादरम्यान नकली साप ,अंगठ्या , बनावट अत्तर, नवसाग, चिंचोके, बनावट मध लोटा तांब्या जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. जादूटोण्याच्या अनुषंगाने एसआयटीकडून देखील तपास करण्यात आला आहे. भोंदू अशोक खरात यांच्या कार्यालयात पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पीडित महिलांसह घटनास्थळावर पंचनामा करण्यात आला. किती महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची एसटी मार्फत चौकशी करण्यात आली आहे. भोंदू खरात जवळ असलेल्या मालमत्तेची देखील चौकशी करण्यात आली आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...