AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओच्या या स्वस्त प्लॅनमध्ये मिळतात 35 हजार100 रुपयांचे गूगल जेमिनी प्रोचे फायदे, जाणून घ्या

जिओकडे 35,100 किमतीत गूगल जेमिनी प्रोचे फायदे देणारे स्वस्त प्लॅन आहेत. हे प्लॅन कोणते आहे, त्याची किंमत किती आहे, त्याची वैधता किती दिवसांची आहे, त्यात किती जीबी डेटा मिळतो आणि या प्लॅनमध्ये कोणते अतिरिक्त फायदे समाविष्ट आहेत? चला जाणून घेऊयात

जिओच्या या स्वस्त प्लॅनमध्ये मिळतात 35 हजार100  रुपयांचे गूगल जेमिनी प्रोचे फायदे, जाणून घ्या
jio rechargeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Mar 29, 2026 | 11:33 AM
Share

रिलायन्स जिओ प्रीपेड सिम वापरकर्त्यांना कंपनीच्या सर्व रिचार्ज प्लॅन्सबद्दल अचूक माहिती असायला पाहिजे. जेणेकरून रिचार्ज करताना कोणते फायदे मिळू शकतात याबद्दल समजेल. त्यासाठी आज आपण कंपनीच्या सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये असे काही स्वस्त रिचार्ज प्लॅन आहेत 35,100 किमतीचे गूगल जेमिनी प्रोचे फायदे मिळतात. या प्लॅनची ​​किंमत ₹299 आहे. या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतात आणि त्याची वैधता किती दिवसांची आहे? चला हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.

जिओच्या 299 रूपयांच्या प्लॅनची माहिती

299 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.

जिओच्या 299 रूपयांच्या प्लॅनची ​​वैधता

वैधतेच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा जिओ प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. 28 दिवसांची वैधता आणि दररोज 1.5 जीबी डेटासह, हा प्लॅन एकूण 42 जीबी हाय-स्पीड डेटा देतो. चला या प्लॅनसोबत मिळणाऱ्या अतिरिक्त फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

अतिरिक्त फायदे

299 रूपयांच्या प्लॅनसोबत तुम्हाला 35 हजार 100 किमतीचा 18 महिन्यांचा गूगल जेमिनी प्रो प्लॅन, 2000 जीबी क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनाना बेनिफिटसुद्धा मिळेल. या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउड स्टोरेजचा मोफत ॲक्सेससुद्धा समाविष्ट आहे. या तीन अतिरिक्त लाभांसाठी कंपनी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही.

एअरटेल 299 रुपयांमध्ये काय ऑफर आहेत?

एअरटेलच्या 299 रूपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 1 जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देते. 28 दिवसांच्या वैधतेसह, या प्लॅनमध्ये 12 महिन्यांसाठी ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम देखील मिळते, ज्याची किंमत अंदाजे 4 हजार रूपयेआहे. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये स्पॅम अलर्ट आणि मोफत हॅलोट्यून्ससारखे अतिरिक्त फायदे देखील मिळतात.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात