AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अलर्ट! भोंदू अशोक खरात याचा व्हिडीओ शेअर करत आहात? थेट होणार जेल, तब्बल 74 लोकांवर..

भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. अशोक खरात याचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या व्हिडीओमध्ये पीडित महिलांचाही चेहरा दिसत असल्याने पोलिसांकडून व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

अलर्ट! भोंदू अशोक खरात याचा व्हिडीओ शेअर करत आहात? थेट होणार जेल, तब्बल 74 लोकांवर..
Ashok Kharat
| Updated on: Mar 28, 2026 | 8:05 AM
Share

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे धक्कादायक कारनामे पुढे येत आहेत. अनेक अधिकारी आणि राज्यातील बड्या नेत्यांच्या संपर्कात भोंदूबाबा होता. हेच नाही तर त्याचे काही फोटोही व्हायरल झाली आहेत. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर थेट भोंदूचे पाय धुताना दिसल्या. रूपाली चाकणकर यांनी व्हायरल होणाऱ्या फोटोंनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. भोंदू अशोक खरात याचे पाय चांगलेच खोलात असल्याचे अगोदरपासूनच स्पष्ट होत आहे. काही धक्कादायक व्हिडीओ पुढे येत आहेत. आपल्या कार्यालयातच हा भोंदूबाबा महिलांवर अत्याचार करत होता. एका मागून एक पुढे येणाऱ्या व्हिडीओंमुळे खळबळ उडाली. या बाबाने अनेक महिलांवर लैगिंक अत्याचार केले, ही वस्तुस्थिती आहे. महिलांची संख्या हजारांवर आहे. पण अशोक खरात विरोधात लेखी तक्रार देण्याकरिता पुढे येणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. हेल्पलाईन नंबरवर महिला तक्रारी करत आहेत, पण लेखी तक्रार किंवा गुन्हा नको म्हणताना दिसत आहेत.

यादरम्यान नाशिक पोलिस चांगलेच अॅक्शन मोडवर असून भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा विरोधात मोठी कारवाई केली जात आहे. सतत भोंदू अशोक खरात आणि पीडित महिलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी असे बरेच व्हिडीओ आहेत, ज्यामध्ये पीडित महिलांचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे.

आता या प्रकरणात भोंदू अशोक खरात याचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या 74 हुन अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नाशिकसह वेगवेगळ्या ठिकाणी हे गुन्हे दाखल करण्यात आले. व्हिडिओ व्हायरल करण्यासंदर्भात कदाचित महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतकी मोठी कारवाई असावी. अशोक खरात प्रकरणातील महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणे महागात पडत आहे.

नाशिक शहरात फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या 65 प्रोफाईल धारकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला. यासोबतच नगर, कोपरगाव यासह विविध भागात ही गुन्हे दाखल करण्यात आली. आक्षेपार्ह व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नका, असे आवाहन नाशिक पोलिसांकडून केले जात आहे. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?