AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरातचे पाय खोलात! भोंदूविरोधात 100 पेक्षा अधिक तक्रारी, थेट 70 टक्के महिलाच..

भोंदू अशोक खरात प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण असून मोठी लाट निर्माण झाली. भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अत्यंत मोठी माहिती पुढे आलीये.

खरातचे पाय खोलात! भोंदूविरोधात 100 पेक्षा अधिक तक्रारी, थेट 70 टक्के महिलाच..
Ashok Kharat
| Updated on: Mar 28, 2026 | 7:42 AM
Share

भोंदूबाबा अशोक खरात याचे एका मागून एक मोठे कारनामे उघड होत आहेत. महिला पुढे येऊन तक्रारी देताना दिसत आहेत. भोंदूचे काही धक्कादायक व्हिडीओ पुढे आले, त्याने मोठी खळबळ उडाली. पोलिसांकडून एक नंबर जारी करण्यात आला, त्या माध्यमातून महिला तक्रारी नोंदवू शकतात. या प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. सुरवातीला रूपाली चाकणकर यांनी आपल्या राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता 10 दिवसांनी रूपाली चाकणकर यांच्याकडून महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यात आला. खरातला अटक झाल्यावर तब्बल 10 दिवसाने हा राजीनामा देण्यात आला. सतत रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठवला आहे. यादरम्यान त्यांनी यासंदर्भातील एक पोस्टही शेअर केली. रूपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केली जात आहेत.

खरातचे काळे कारनामे एका मागून एक पुढे येत आहेत. मात्र, लेखी तक्रार महिलांकडून द्यायला तेवढा प्रतिसाद नाहीये. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, फोनद्यावरे भोंदू अशोक खरात याच्या विरोधात 100 पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. पाच दिवसांपूर्वी एसआयटीकडून भोंदू अशोक खरात याच्याविरोधात तक्रारी दाखल करण्याकरिता एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला होता.

तक्रारींमध्ये 70 टक्के महिलांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. मात्र लेखी तक्रारींसाठी प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आलीये. एसआयटीचे अधिकारी तक्रारदारास सुरक्षिततेची हमी देत मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही महिला पुढे येऊन तक्रार देण्यास धजावत नसल्याचे बघायला मिळत आहे.

अशोक खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा दोन गुन्हे दाखल झाले. एका महिलेची लैंगिक शोषणाची तर एका इसमाची फसवून केल्या प्रकरणी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली. राजेंद्र भागवत राहणार नेवासा या व्यावसायिकाला व्यवसायिक बरकतीसाठी वेगवेगळ्या अंगठ्या लाखो रुपयांना विकून फसवणूक केल्या प्रकरणी खरात विरोधात गुन्हा करण्यात आला. तर एक विवाहित महिलेचा तिच्या पतीसोबत वाद होत असल्याने त्यावर सल्ला घेण्यासाठी गेली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'