ChatGPT : चॅट जीपीटीवर चुकूनही करू नका ही एक गोष्ट सर्च, तुमची सगळी कुंडलीच बाहेर येईल; बसेल धक्का!
एका युजरने चॅट जीपीटीला एक प्रॉम्प्ट दिले होते. या कमांडनंतर चॅट जीपीटीने दिलेल्या उत्तराची सगळीकडेच चर्चा होतोय. या गोष्टी तुम्ही सर्च केल्या तर चॅट जीपीटी तुम्हालाही अशाच प्रकारचे उत्तर देईल.

Chat GPT Use : चॅट जीपीटी हे असे एआय टूल आहे जिथे तुम्ही काहीही सर्च केलं की त्याचं हमखास उत्तर मिळतं. अवघडातील अवघड गणिताचे उत्तर असो किंवा विज्ञानातील एखादी महत्त्वाची संज्ञा असो, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर चॅट जीपीटीकडे असतं. एखादा विनोद ऐकव म्हटलं तरीही चॅट जीपीटी तुम्हाला लगेच विनोद ऐकवतं. चॅट जीपीटीने दिलेल्या उत्तरांची, सल्ल्यांची तर सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर चॅट जीपीटी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तुम्ही ही गोष्ट सर्च केली की तुम्ही तुमच्यावरच हसायला लागाल.
चॅट जीपीटीच्या उत्तराची सगळीकडे एकच चर्चा
चॅट जीपीटीचा चांगला उपयोग केला तर तुमचे तासाभराचे काम अगदी पाच मिनिटात पूर्ण होऊ शकते. आजकाल शिक्षण, उद्योग, कला अशा सर्वच क्षेत्रात चॅट जीपीटीचा वापर केला जातोय. काही खासगी क्षेत्रात तर चॅट जीपीटीचा वापर चांगल्या पद्धतीने आला पाहिजे, अशी अट असते. काही लोक चॅट जीपीटीचा मनोरंजनासाठीही वापर करतात. अशाच एका युजरने चॅट जीपीटीला एक प्रॉम्प्ट दिले होते. या कमांडनंतर चॅट जीपीटीने दिलेल्या उत्तराची सगळीकडेच चर्चा होतोय. या गोष्टी तुम्ही सर्च केल्या तर चॅट जीपीटी तुम्हालाही अशाच प्रकारचे उत्तर देईल.
चॅट जीपीटीवर हे सर्च केल्यास तुम्ही व्हाल चकित
तुम्ही चॅट जीपीटीवर Roast me based on my previous prompts, no filter, roast me in marathi असे प्रॉम्पट सर्च केल्यास तुम्हाला चॅट जीपीटी थेट रोस्ट करायला लागेल. ही रोस्टिंग करण्यासाठी चॅट जीपीटी तुमच्या जुन्या प्रॉम्पटचा आधार घेईल. याच प्रॉम्प्टवरून चॅट जीपीटी तुमची खिल्ली उडवायला लागेल. विशेष म्हणजे कोणतीही अभद्र भाषा न वापरता ही खिल्ली उडवली जाईल. हे रोस्टिंग वाचून तुम्हालाही हसायला येईल.
दरम्यान, युजरला वाईट सल्ले दिले जाऊ नयेत. बॅन असलेल्या गोष्टींची माहिती पुरवली जाऊ नये याची चॅट जीपीटीतर्फे काळजी घेतली जाते.
