AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बटाट्याच्या रसाने खरंच काळवंडलेली त्वचा चमकदार होते? जाणून घ्या याबद्दल या महत्त्वाच्या गोष्टी

बटाट्याचा रस त्वचेवरील काळपटपणा (टॅनिंग) दूर करू शकतो. तर आजच्या लेखात आपण स्किन केअरच्या रूटिंनमध्ये बटाट्याच्या रसाचा समावेश करण्याचे फायदे स्पष्ट करणार आहोत. तसेच त्याचे दुष्परिणाम देखील जाणून घेऊयात.

बटाट्याच्या रसाने खरंच काळवंडलेली त्वचा चमकदार होते? जाणून घ्या याबद्दल या महत्त्वाच्या गोष्टी
बटाट्याच्या रसाने खरंच काळवंडलेली त्वचा चमकदार होते? जाणून घ्या याबद्दल या महत्त्वाच्या गोष्टीImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 6:24 PM
Share

आजकाल स्किन केअर करताना अनेकजण घरगुती उपाय करण्याला प्राधान्य देत आहेत. यापैकी एक म्हणजे चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावणे. बटाट्याच्या रसाने त्वचेचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते. तज्ञांच्या मते, एकदा का त्वचेचा टॅनिंग आले की, ते वेळेवर कमी न केल्यास त्वचा अजून टॅन झालेली दिसते. कारण उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश, उष्णता आणि गरम तापमानाच्या लाटांमुळे त्वचेवर धूळ आणि घाण जमा होते. यामुळे काळपटपणाव्यतिरिक्त, त्वचेवर डाग पडण्याचा धोकाही वाढतो. ही घाण त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा होते, ज्यामुळे मुरुमे किंवा पुरळ येऊ शकतात. या नंतर या पुरळ आणि मुरुमांचे हळूहळू डागांमध्ये रूपांतर होते.

बाजारात स्किन केअर प्रोडक्ट उपलब्ध असली तरी, आजकाल लोकं घरगुती उपायांकडेही वळत आहेत. या घरगुती उपायांपैकी एक म्हणजे चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावणे. तर आजच्या लेखात आपण चेहऱ्यावर बटाट्याच्या रसाचा वापर करण्याचे फायदे त्यासोबतच कोणी याचा वापर टाळावा हे देखील जाणून घ्या.

उन्हाळ्यात स्किन केअरसाठी उत्तम आहे बटाट्याचा रस

त्वचेचा रंग सुधारते – सुमारे 100 ग्रॅम बटाट्यामध्ये 13 मिग्रॅ व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे हा रस त्वचेवर लावल्याने त्वचेचा रंग सुधारू शकतो. शिवाय त्वचेवरील काळे डाग देखील कमी करते. बटाट्यामध्ये असे एन्झाइम्स देखील असतात जे त्वचेचा रंग उजळण्यास मदत करतात.

तेल नियंत्रण – बटाट्याच्या रसामध्ये स्टार्च असतो, जो त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करतो असे मानले जाते. तज्ञांच्या सल्ल्यानुसार तेलकट त्वचा असलेल्यांनी त्यांच्या स्किन केअरच्या रूटिंनमध्ये बटाट्याच्या रसाचा वापर करण्याचा विचार करावा.

वृद्धत्वविरोधी परिणाम – बटाट्याच्या रसामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. असेही म्हटले जाते की यामुळे अकाली वृद्धत्व कमी होते. बटाट्याचा रस अकाली सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करू शकतो.

त्वचेला आर्द्रता देण्यास मदत करते – तज्ञांच्या मते, यामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या ओलावा मिळण्यास मदत होते. उन्हाळ्यात त्वचेला आर्द्रता देण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा त्वचेला बटाट्याचा रस लावणे उत्तम ठरते.

या लोकांनी चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावू नये

संवेदनशील त्वचा असलेल्यांनी – ज्यांची त्वचा आधीपासूनच संवेदनशील आहे, त्यांनी बटाट्याचा रस लावणे टाळावे. असे मानले जाते की त्यातील स्टार्चमुळे या प्रकारच्या त्वचेवर खाज किंवा जळजळ होऊ शकते.

खाज किंवा जळजळ: जर एखाद्या व्यक्तीच्या त्वचेला आधीच खाज येत असेल किंवा जळजळ होत असेल, तर बटाट्याचा रस लावू नये. यामुळे त्रास वाढू शकतो.

हिरवे बटाटे – जर बटाटा हिरवा दिसत असेल, तर त्याचा रस चेहऱ्यावर लावणे टाळा. अशा बटाट्यांमध्ये सोलानिन नावाचे एक विषारी संयुग असते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण